वृत्त विशेष

फास्टॅग नसेल तरी आता नो टेन्शन ! नाही भरावा लागणार दुप्पट टोल; जाणून घ्या कसं?

आता सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तुमच्याकडे फास्टॅग नसल्यास तुमची कार टोल पार करू शकणार नाही. मात्र एका विशेष सेवेचा वापर करून, फास्टॅग नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचता येतं.

ही सुविधा येईल कामी :-

जर फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा (Prepaid touch and go card service) वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाझावर (NHAI) गर्दी कमी करण्यासाठी सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे.

असा घ्या लाभ:-

>

गाडीवर फास्टॅग नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता.
प्रीपेड कार्ड फास्टॅग असल्यावरही वापरता येतं. फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास टोल कर भरण्यास या कार्डचा वापर करता येईल.

फास्टॅग कसा काढायचा?

  • फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे.
  • या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल.
  • बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे.
  • Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही फास्टॅग काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?

  • जर तुम्ही फास्टॅग बँक खात्यासोबत लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही.
  • तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल.
  • फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता.

एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही. दोन गाड्या असल्यास दोन वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.