शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

या लेखामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा अंतर्गत) शेततळे योजनेची माहिती घेणार आहोत.

या योजनेत कोण सहभागी होऊ शकतात:            

(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                                               

(2) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.

शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

लाभार्थी पात्रता:

शेतकरी यांचेकडे किमान 0.60 हे.जमीन असावी. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे/सामुहिक शेततळे/बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा. 

उद्दिष्टे:

१. प्रकल्पातंर्गत निवडलेल्या गाव समुहा मधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परीस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.

२. संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.

३. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे.

लाभार्थी निवडीचे निकष  :

१. प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.

२. निवडलेल्या आकारमानाच्या  शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

३. शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्याने विहित आकारमानानुसार स्वत: इनलेट आउटलेट विरहित शेततळे केले असल्यास अस्तरीकरण या घटकासाठी शेतकरी पात्र राहील.

शेतकऱ्याच्या जागा निवडीसाठी तांत्रिक निकष:

शेततळ्यासाठी जागेच्या निवडीबाबत निकष खालीलप्रमाणे राहतील.

१. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे.

२. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन  असलेल्या जागेची निवड करावी.

३. काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.  

४. मुरमाड व वालुकामरय  सच्छिद्र खडक असलेली जागा शेततळ्याकरता निवडू नये.

५. क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत. 

६. शेततळ्याच्या क्षमतेनुसार आवश्यक पाणलोट क्षेत्र असल्याची खात्री करावी.

७. नाल्याच्या /ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये. 

८. इनलेट/आऊटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.

९. इनलेट/आऊटलेट विहिरीत शेततळ्यासाठी  पाणी पुनर्भरणासाठी स्त्रोत असल्याची खात्री करण्यात यावी. या बाबी विचारात घेवून शेततळ्याचा प्रकार निवड करावा.

१०. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन इनलेट आउटलेटसह शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनभरण करणे शक्य होईल.

११. इनलेट आऊटलेटसह शेततळे यासाठी लाभार्थी निवडताना पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच, पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा नैसर्गिकरित्या शेततळ्यात येणे आवश्यक आहे याची प्रथम खात्री करावी. 

शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज कुठे करावा?

इच्छुक शेतकऱ्यांनी  https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.    

अधिक माहिती करिता इथे क्लिक करा. 

हेही वाचा - नवीन विहीर योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments