वृत्त विशेषउद्योगनीतीसरकारी योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी उद्योग कर्जासाठी ऑनलाईन करा अर्ज

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग, व्यवसाय करता यावा यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेतल्यास नियमित कर्जाची परतफेड केली तर तुमच्या कर्जाचे सव्वा चार लाखांपर्यंतचे व्याज महामंडळ भरते. अर्थात बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळते. महामंडळाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५०९ बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेतला.

कागदपत्रे काय लागणार ?

अर्जदाराचे पॅनकार्ड, टी.सी., रेशन कार्ड, आधारकार्ड, पती-पत्नीच्या उत्पन्नाचा दाखला, व्यवसायासंबंधी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालाची मदत घेऊ नये. इच्छुकांनी थेट महामंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावेत. कोणतीही अडचण असेल तर तत्काळ जिल्हा समन्वयक कार्यालयात येऊन संपर्क साधावा. २१ मे २०२२ पासून कर्ज मर्यादा १५ लाख रुपये केली आहे. वाढलेल्या मर्यादेचा लाभ घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त मराठा तरुणांनी महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेचा लाभ घ्यावा.

>

२८५ कोटी ६४ लाखांचे कर्ज वाटप:

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील ४ हजार ५०९ बेरोजगार तरुणांना बँकेने कर्ज देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनविले. या तरुणांना विविध बँकांनी तब्बल २८५ कोटी ६४ लाख ९८ हजार ३८६ रुपये कर्ज वाटप केले.

कर्जासाठी ऑनलाइन करा अर्ज:

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी मध्यस्थाची कोणतीही गरज नसल्याचे महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी https://www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावी.

निकष काय?

महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य, ज्या जातीच्या लोकांसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा जात प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. जातीचा दाखला, पुरुष उमेदवाराचे वय ५० वर्षे, तर महिलेचे वय ५५ पेक्षा अधिक असू नये. अर्जदार पती – पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या मर्यादित असावे.

३७४० कर्जदारांना व्याज परत:

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेनुसार कर्जाचा हप्ता नियमित भरणाऱ्या कर्जदाराला व्याजाचा दरमहा परतावा केला जातो. व्याजाची ही रक्कम कर्जदाराच्या बँक खात्यात दरमहा जमा केली जाते. यानुसार महामंडळाच्या शिफारशीनंतर बँकांनी कर्ज दिलेल्या ३ हजार ७४० कर्जदार हे नियमित कर्जाचा हाता भरतात. कर्जाच्या हप्त्याची रक्कम त्यांनी बँकेत जमा केल्यानंतर काही दिवसांनी महामंडळाच्यावतीने कर्ज खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाते.

हेही वाचा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना – Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.