वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण योजना – Livestock Health and Disease Control

केंद्र शासनाच्या दि. २३ ऑगस्ट, २०२१ च्या पत्रान्वये केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण (LH & DCP) या योजनेस केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रम (LH & DCP)  या समूहगट योजनेमध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) आणि पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण (LH & DC) या दोन्ही योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या (NADCP) राज्यातील अंमलबजावणीसाठी खालील शासन निर्णयातील संदर्भीय क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण योजना – Livestock Health and Disease Control :

पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण (LH & DC) या योजनेमध्ये खालील तीन उपयोजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१. गंभीर स्वरूपाचे पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (Critical Animal Disease Control Programme -CADCP) (900%) –

>

या उपयोजने अंतर्गत पीपीआर व सीएसएफ या दोन रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे सन २०३० पर्यंत नियंत्रण व निर्मूलन करावयाचे असून राज्यातील १०० टक्के शेळ्या – मेंढ्यांना पीपीआर (PPR) प्रतिबंधात्मक व १०० टक्के पात्र वराहांमध्ये सीएसफ (CSF) प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.

प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविताना अपुरे पडणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरीता शासकीय यंत्रणे व्यतिरीक्त खाजगी मनुष्यबळ (पशुमित्र/पशुसखी/पशुबंधु उपलब्ध करण्यासाठी देखील निधी उपलब्ध होणार आहे.

प्रतिबंधात्मक लसीकरणापूर्वी जनावरांच्या कानात बिल्ले लावून ईनाफ़ प्रणालीवर त्यांची नोंद घेणे बंधनकारक आहे.

२. पशुवैद्यकीय संस्थांचे बांधकाम व बळकटीकरण करणे या योजने अंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथकांची स्थापना करणे (Establishment and Strengthening of Milblle Veterinary Units ESVHD MVU) :

सन २०२१-२२ या वर्षापासून सदर उपयोजनेमधून पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बांधकाम व बळकटीकरण ऐवजी फिरत्या पशुचिकित्सा पथकाची स्थापना करणे ह्या योजनेचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे.

प्रत्येक फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने रोग निदान, औषधोपचार, लसीकरण, शल्यचिकित्सा तसेच दृकश्राव्य माध्यम व विस्तार विषयक सेवा पशुपालकांपर्यंत पुरविण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या फिरत्या पशुचिकित्सा पथकांचे सनियंत्रण राज्यस्तरीय कॉल सेंटरद्वारे करणे अभिप्रेत आहे.

फिरत्या पशुचिकित्सा पथकाची स्थापना करणे या उपयोजनेअंतर्गत एकूण ८० चार चाकी वाहन व अनुषंगिक बाबी (फॅब्रिकेशन व उपकरणे) उपलब्ध करण्यासाठीचा १०० टक्के केंद्र हिश्याचा अनावर्ती खर्चाचा एकूण निधी रु.१२८०,०० लक्ष केंद्र शासनाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर या कार्यालयाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी उघडलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील स्वतंत्र खात्यामध्ये सन २०२१-२२ मध्ये जमा करण्यात आलेला आहे.

३. ॲस्कॅड (Assistance to states for Control of other Economically Important Exotic, Emergent and Zoonotic Livestock and Poultry Diseases- ASCAD) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या रोगांचे लसीकरण कार्यक्रम व इतर सहा उपघटक :

सदर उपयोजनेंतर्गत खालील विविध ०६ उपक्रम राबविण्यात यावेत.

अ. पशुधन व कुक्कुट पक्ष्यांमधील विविध रोगांचे लसीकरण, लसीकरणासाठी आवश्यक साधन सामुग्री, जंतनाशक औषधे तसेच इतर सांसर्गिक रोग जसे की, अॅग्रॅक्स, रेबीज, गोट पॉक्स इत्यादी रोगांवरील लसीकरण (केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०%)

आ. सर्वेक्षण, सनियंत्रण व पुर्व अंदाज बांधणे (केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०%)

इ . संशोधन व नवीन उपक्रम, प्रशिक्षण केंद्र हिस्सा १००%)

ई. माहिती – जनजागृती केंद्र हिस्सा १००%)

उ. विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण अंतर्गत राष्ट्रीय पशुरोग वार्तांकन प्रणाली (National Animal Disease Reporting System, NADRS) (केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०%)

ऊ. अचानक उद्भवणाऱ्या व विदेशी आजारांचा प्रतिबंध करणे (केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०%), (केंद्र हिस्सा ५०% व राज्य हिस्सा ५०%)

सदर केंद्र पुरस्कृत समुहगट योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कृषी,पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय :

शेळ्या – मेंढ्यामधील पीपीआर (PPR) व वराहांमधील क्लासिकल स्वाइन फ़िव्हर (CSF) या गंभीर स्वरुपाच्या रोगांचे नियंत्रण करणे (CADCP), फिरत्या पशुचिकित्सा पथकाची स्थापना करणे (ESVHD – MVU). अॅस्कॅड अंतर्गत विविध उपयोजना राबविणे अशा समुहगट योजना समाविष्ट असलेल्या पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या (Livestock Health & Disease Control Programme) राज्यातील सन २०२१-२२ पासूनच्या अंमलबजावणीस याद्वारे शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

सदर समुह गट योजनेमधील राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध होणारी शीत साखळी सुविधा, इअर टॅग्स तसेच अॅस्कॅड अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या जंतनाशक औषधांचा वापर उपरोक्त नमुद सर्व प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांमध्ये करण्यात यावा. या योजनेंतर्गत झालेल्या सर्व प्रतिबंधात्मक लसीकरणांच्या नोंदी ईनाफ (Information Network for Animal Productivity and Health INAPH) प्रणालीवर नोंदविण्यात याव्यात.

केंद्र शासनाने वेळोवेळी या योजनांच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व यासाठी राज्यास प्रत्यक्ष प्राप्त होणारा निधी यास अधीन राहून सदरच्या कार्यक्रमांची राज्यात अंमलबजावणी करण्यात यावी.

सदर कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस्तव केंद्र शासनासोबत समन्वय साधण्यासाठी गंभीर स्वरुपाच्या रोगांचे नियंत्रण व ॲस्कॅड याकरीता सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे आणि फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करणे या करीता अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राज्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

शासन निर्णय: केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गंभीर स्वरूपाचे पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, पशुवैद्यकीय संस्थांचे बांधकाम व बळकटीकरण या योजने अंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करणे व ॲस्कॅड या समुहगट योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या सेवाशुल्कात सुधारणा – Changes in AHD service charges

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.