वृत्त विशेषकृषी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2023 : गाय गोठा / कुकुट पालन शेड / शेळी पालन शेड !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तीना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याद्वारे कायम स्वरूपी मत्ता निर्माण करणे हा आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय क्र.मग्रारो-२०२०/प्र.क्र.७०/रोहयो-७, दि. ०३ फेब्रुवारी २०२१ अन्वये “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत जनावरांचा गोठा बांधणे, शेळी पालन शेड बांधणे व कुक्कूटपालन शेड बांधणे यापैकी एक काम एका लाभार्थ्यास मंजूर करून प्रत्यके लाभार्थी पातळीवर मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय कामे १) वैयक्तिक क्षेत्रावर वृक्ष लागवड व संगोपन (३ वर्ष – १ हेक्टर) (कोणतेही वृक्ष किवा विविध वृक्षांचे मिश्रण ), २) वैयक्तिक शेततळे १५X१५X१५ मी चे लाभ घेतलेले लाभार्थी, ३) सार्वजनिक क्षेत्रावर व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड संगोपन कामे (किमान २०० झाडे चा एक गट संगोपन करणारे कुटुंब), ४) कंपोस्ट बडींग चे लाभ घेतलेले लाभार्थी, तसेच योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नरेगा अंतर्गत २७५ वैयक्तिक व सार्वजनिक कामापैकी ज्या कामामध्ये अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व कामाच्या संयोजनातून ६०:४० चा अकुशल कुशल प्रमाण राखण्याचा प्रयत्न करणारे सर्व कुटुंब / लाभार्थी / मजुर हे लाभ घेण्यास पात्र राहतील.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2023 : गाय गोठा / कुकुट पालन शेड / शेळी पालन शेड !

वरील प्रमाणे जे लाभार्थी योजने अंतर्गत कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण ६० : ४० राखण्याचा प्रयत्न करणारे असे सर्व इच्छुक कुटुंबास / अर्जदारास योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहतील. सदर पात्र अर्जदार यांनी खालील एकाच कामासाठी एकच अर्ज करणे आवश्यक आहे.

1) मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विवीध वैयक्तिक (उदा. कामाचा प्रकार फळबाग, वृक्षलागवड, शेततळे) व सार्वजनिक (उदा. कामाचा प्रकार रस्ता ओढा / नाला / पाझर तलाव गाळ काढणे / ग्रा.प क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन इ.) कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण ६०:४० लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजने अंतर्गत काम केलेले असावे. (याबाबत ग्रामसेवक / कृषी सहाय्यक / यंत्रणा अधिकारी यांचा कामाबाबतचा शिफारस दाखला जोडावा.)

>

2) सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान २० ते ५० फळझाडे / वृक्षलागवड करण्यात येऊन त्याचे तीन वर्ष संगोपन करून झाडे १००% जिवंत ठेऊन योजनेचा लाभ पूर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस काम पुर्ण करणे आवश्यक आहे.

  • १) वैयक्तिक क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे / वृक्षलागवड केल्यास गाय गोठा (छता विरहित ) कामाचा लाभाकरिता पात्र असेल.
  • २) वैयक्तिक क्षेत्रावर ५० पेक्षा जास्त फळझाडे / वृक्षलागवड केल्यास गाय गोठा (छतासह ) / शेळी पालन शेड / कुक्कूटपालन कामाचा लाभाकरिता पात्र असेल.
  • ३) सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस काम केल्यास छतासह गोठा / शेळी पालन शेड / कुक्कूटपालन कामाचा लाभाकरिता पात्र असेल (मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प पुणे यांचे शुद्धीपत्रक परिपत्रक क्र. / मग्रारोहयो /कावि-१२०/२०२०, दि. ०७/०७/२०२० अन्वये पुणे जिल्हा मध्ये “हरघर गोठे घर घर गोठे योजना राबविणेबाबत )

3) पशुपालन असलेबाबतचा पशुधन पर्यवेक्षक / पशुधन अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

  • गाय गोठा करीता २ ते ६ गुरे आवश्यक आहेत. ( जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील),
  • पालन शेड करीता २ ते १० शेळी आवश्यक आहे. –
  • कुकुट पालन शेड करीता किमान १०० पक्षी आवश्यक आहे. ( ज्या लाभार्थीकडे १०० पक्षी नाही त्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमिनदारांसह शेडची मागणी करावी व शेडचे काम पुर्ण झाल्यानंतर १ महिन्याच्या कालावधीत कुकुटपालन शेड मध्ये १०० पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील.

4) कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र Online जॉबकार्ड किवा जॉबकार्ड झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

5) लाभार्थीच्या नावे जमीन / जागा असणे आवश्यक आहे. ( असल्यास सोबत ७/१२, ८ अ व ग्रामपंचायत नमुना ९ चा उत्तारा (तीन महिने आतील) साक्षांकित सत्य प्रत जोडावा )

6) लाभार्थी सदर गावाचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. (रहिवासी स्वयंघोषणापत्र ).

7) लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स प्रत

8) लाभार्थी चे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरॉक्स प्रत

9) सदरचे काम ग्रामपंचायत चालू वार्षिक कृती आराखडा / लेबर बजेट / पुरवणी लेबर बजेट मध्ये नाव समाविष्ट असलेबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार शिफारस पत्र घेणे आवश्यक आहे.

11) निवडलेल्या कामाचा / जागेचा अक्षांश-रेखांश असलेला फोटो सह ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक (नरेगा) / पशुधन पर्यवेक्षक, लाभार्थी यांची संयुक्त सहीचा स्थळ पहाणी अहवाल जोडणे आवश्यक आहे.

सदर लाभार्थीचे काम मंजुर झाल्यास योजनेंतर्गत केलेल्या कामाचे फोटो १) काम सुरु करण्यापुर्वीचा फोटो, २) काम चालू असतानाचा फोटो, ३) काम पूर्ण झालेल्याचा बोर्ड व लाभार्थी सह फोटो इत्यादी हे तीन प्रकारामधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत ७ दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना गाय गोठ (छतासह / विरहित ) / कुकुट पालन शेड / शेळी पालन शेड वैयक्तिक कामासाठी अर्जाचा नमुना:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत ” शरद पवार ग्रामसमृध्दी योजना गाय गोठ (छतासह / विरहित ) / कुकुट पालन शेड / शेळी पालन शेड वैयक्तिक कामासाठी अर्जाचा नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.