आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस

आपण या लेखामध्ये आधार PVC कार्ड कसे बनवायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.  आधार कार्ड (Aadhar Card) हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्ड चा उपयोग शासकीय तसेच सरकारी कामासाठी होत असतो. अशावेळी तुमचे आधार कार्ड सुरक्षित असणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेता UIDAI ने आता एटीएम प्रमाणे दिसणारे Aadhaar PVC Card जारी केले आहे. हे कार्ड तुम्ही केवळ 50 रुपयात बनवू शकता. जाणून घ्या हे कार्ड  तुम्ही ऑनलाइन कसे मागवू शकता. ऑर्डर केल्याच्या 5 दिवसानंतर कार्ड डिपार्टमेंटकडून तुमच्या घरी पाठवले जाईल. PVC कार्ड एक प्रकारचे प्लॅस्टिकचे कार्ड असते.

आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड, ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस


आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याची प्रक्रिया:

सर्वप्रथम नवीन आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी UIDAI च्या खालील वेबसाइटवर जा.

https://uidai.gov.in/

  1. वेबसाइटवर गेल्यावर 'My Aadhaar' सेक्शनमध्ये जाऊन 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा.
  2. 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्यूअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल.
  3. यानंतर कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर (Send OTP ) वर क्लिक करा. 
  4. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर टाका.

Enter your 12 digit Aadhaar Number / 16 digit Virtual ID / 28 digit EID to begin.

ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आधार PVC कार्डाचा प्रीव्ह्यू दिसेल. त्यानंतर खाली देण्यात आलेल्या Make Payment  या ऑपशन वर क्लिक करा.

आधार PVC कार्ड असं बनवा ATM सारखं दिसणार आधार कार्ड, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

Make Payment या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ५० रुपये एवढे पेमेंट येथे करायचे आहे. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंच्या  माध्यमाद्वारे पेमेंट करू शकता.

आधार PVC कार्ड असं बनवा ATM सारखं दिसणार आधार कार्ड, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस


पेमेंट केल्यावर तुम्ही (AADHAAR CARD PAYMENT RECEIPT) आधार कार्ड पेमेंटची पावती Download Payment Receipt बटन वर क्लिक करून डाउनलोड करून ठेवा. 

आधार PVC कार्ड असं बनवा ATM सारखं दिसणार आधार कार्ड, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आता तुम्ही (AADHAAR CARD PAYMENT RECEIPT) आधार कार्ड पेमेंटची पावती पाहू शकता.

आधार PVC कार्ड असं बनवा ATM सारखं दिसणार आधार कार्ड, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आधार अपडेट स्टेट्स चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर टाकून Captcha टाका आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर OTP येईल तो टाकून Check Status वर क्लिक करा. 


पीव्हीसी कार्डसाठी आपली विनंती प्राप्त झाली आहे असे दाखवेल आणि त्यावर प्रक्रिया चालू आहे. कृपया अद्यतनित स्थिती पाहण्यासाठी 24 तासानंतर साइटवर पुन्हा भेट द्या किंवा रजिस्टर मोबाईलवर एसएमएस द्वारे सूचना मिळेल.

हेही वाचा - आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये बदल करा फक्त ५० रुपयात (नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख इत्यादी), जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments