मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा शेतीचे सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारीक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाव्दारे सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उदिष्ट्ट साध्य व्हावे याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” सुरु करण्यात आली आहे. शेतजमिनीचे 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर 7.5 एचपी साठी अर्ज करू शकता, शिल्लक कोठ्यासाठी अर्ज भरले जात आहेत. या लेखात आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

सौरकृषीपंपाचे फायदे:

  1. दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
  2. दिवसा विनाव्यक्तय अखंडित वीज पुरवठा
  3. वीज बिलापासून मुक्तता
  4. डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
  5. पर्यावरण पुरक परिचलन
  6. शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
  7. औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी करणे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील महावितरणची वेब पोर्टल ओपन करा. 


महावितरणची वेब पोर्टल ओपन झाल्यावर त्यामध्ये वरील टॅब मध्ये "लाभार्थी सुविधा" मध्ये "ऑनलाइन अर्ज" या पर्यायामध्ये "नवीन ग्राहक (3/५ अश्वशक्ती विद्युतभार)" या पर्यायावर क्लिक करा. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू


आता आपण पाहू शकतो "पारेषण विरहित सौर कृषि पंपसाठी ऑनलाईन अर्ज फॉर्म (नमुना-ए१) - ७.५ एचपी लोड करीता" असा फॉर्म ओपन होईल. 

पैसे भरुन प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहक तपशील:

अर्जदाराने या अगोदर महावितरणच्या पारंपारीक पद्धतीने शेतीकरिता वीजपुरवठा मिळणेसाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अदयापही प्रलंबित असेल, त्याठिकाणी पारेषण विरहित सौर कृषि पंपाकरीता खालीलप्रमाणे माहिती भरावी.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
अ. अर्जदाराचा आणि जागेचा तपशील:

इथे अर्जदाराचा आणि जागेचा तपशील भरा.
 
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

अ.-II  जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक (पंप आस्थापित करावयाचा शेती नजीकच्या):

यामध्ये आपल्या जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक (पंप आस्थापित करावयाचा शेती नजीकच्या) माहिती भरायची आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ब. अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण:

पुढे आपला म्हणजेच अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाणाची माहिती भरायची आहे.  

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
क. जलस्तोत्र प्रकार:

जलस्तोत्र प्रकार यामध्ये आपल्या शेतीमध्ये विहीर किंवा कूपनलिका असेल ते निवडा आणि किती फूटमध्ये खोली आहे ते अर्जामध्ये भरा. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7.5 एचपी लोडसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
महावितरण आपल्या दारी:

आपणाकडे महावितरण आपल्या दारी अंतर्गत वीज जोडणी आहे का? (होय /नाही) मध्ये निवडा, असल्यास कृपया ग्राहक क्रमांक नमुद करा.

ड. घोषणापत्र:

घोषणापत्र वाचून "वरील माहिती मी वाचलेली आहे / मला वाचून दाखविण्यात आली आहे व मला समजली आहे. त्यावर मी कोणत्याही दबावाखाली न येता स्वखुशीने मान्य करीत आहे." या टॅब वर टिक करा.

कागदपत्रे अपलोड करा: (पीडीएफ फाइल अपलोड करा कमाल आकार ५०० केबी )

अ. पत्त्याचा पुरावा (आवश्यक कागदपत्रे):

१. ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.
२. आधारकार्ड प्रत

ब. इतर कागदपत्रे (लागु असल्यास)

१. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला
२. शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
३. अनुसुचित जाती/जमातीचे/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र

वरील आवश्यक कागदपत्रे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर "अर्ज सादर करा" वर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यानंतर पोचपावती मिळेल त्यामध्ये "लाभार्थी क्रमांक आणि लाभार्थ्यांचे नाव" असेल. 

Post a Comment

0 Comments