आर.टी.ई. (RTE) 25% योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश 2021 साठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. आरटीई प्रवेश 2021 ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थी नोंदणी करू शकतात, आरटीई प्रवेश 2021 तारीख, शाळा यादी, प्रवेश प्रक्रिया आणि लॉटरी तपासू शकतात. इच्छुक उमेदवार आरटीई 25 प्रवेश 2021 महाराष्ट्रसाठी आर.टी.ईच्या अधिकृत वेबसाइट ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या जागांवर ऑनलाईन अर्ज करण्यास मदत करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया या लेखामध्ये उपलब्ध आहे. आरटीई 25 प्रवेशानंतर सर्व विद्यार्थी आरटीई प्रवेश 2021 महाराष्ट्र अर्ज भरू शकतात. अधिकृत निवेदनानुसार आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2021 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मागील वर्षाप्रमाणेच आहे.

आर.टी.ई. (RTE) 25% योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रोसेस जाणून घ्या सविस्तर माहिती

आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता आवश्यक कागदपत्रे:

सन २०२१-२०२२ या वर्षाकरिता आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दिनांक 03 मार्च 2021 रोजी दुपारी ३ वा. पासून ते 21 मार्च 2021 पर्यंत मुदत आहे. पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

1) रहिवासाचा पुरावा:

आधार कार्ड/पासपोर्ट/देयक/वीज/टेलिफोन बील/घर पट्टी/दुय्यमवास्तव्याचा निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा/ वाहनचालविण्याचा परवाना/प्रॉपर्टी टॅक्स देयक/गॅस बुक/बैकपासबुक/ड्रायवींग लायसन्स/रेशनिंग कार्ड/यापैकी कोणतेही एक आधारकार्ड, मतदान ओळखपत्र.

2) जातीचे प्रमाणपत्र(वडिलांचे):

तहसिलदार / उपजिल्हाधिकारी /उपविभागीय अ अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

हेही वाचा - जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

3) दिव्यांग प्रमाणपत्र:

जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हाशासकीय रुग्णालय यांचे 40 टक्‍के पेक्षा जास्त अपंगत्व/दिव्यांगमुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा.

4) कुटुबाचा उत्पन्नाचा दाखला:

तहसिलदार नायब तहसिलदार/दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. उत्पन्नाच्या दाखल्याकरिता तहसिलदारांचा दाखला/कंपनीचा किंवा एम्प्लॉयेरचा दाखला गृहीत धरावा (आर्थिक वर्ष 2018-19 किंवा सन2019-20 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले).

हेही वाचा - उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

5) जन्माचा दाखला:

ग्रामपंचायत / न.पा / म.न.पा. यांचा दाखला / रुग्णालयातीलANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतीलरजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.

6) घटस्फोटीत महिला:

अ) न्यायालयाचा निर्णय, ब) घटस्फोटित महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, क) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किवा त्याच्यावडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातीलअसल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

7) न्यायप्रविष्ट:

अ) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, ब) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्याआईचा रहिवासी पुरावा, क) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुबल गटातीलअसल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

8) विधवा महिला:

अ)पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र (प्रमाणपत्र), ब) विधवा महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, क) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किवा त्याच्यावडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातीलअसल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

9) अनाथ बालके:

अ) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्यधरण्यात यावीत, ब) जर बालक अनाधालयात राहत नसेल तर जे पालक त्याचासांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

10) एकाकी पालक:

विधवा, घटस्फोटित आई अथवा वडिल या पैकी कोणताही एक पर्याय निवडल्यास निवडलेल्या व्यक्तीचे सर्व कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील.

आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२०२२:

  1. पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेज वरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिककरून त्या मधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.
  2. पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर (Help Center) जाऊन प्रवेश पात्र बालकाचा अर्ज भरावा .
  3. मदत केंद्रांची यादी होम पेज वर HelpCenters यावर क्लिक केल्यावर प्राप्त होईल.
  4. एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा . एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील .
  5. प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास ,तो रद्द(Delete Application)करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत .
  6. प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरीलच पत्ता अचूक भरावा.
  7. पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
  8. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  9. यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये .
आर.टी.ई. (RTE) 25%  योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम खालील कोणत्याही एका वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. 

आर.टी.ई. (RTE) 25%  योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.  

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments