गृहनिर्माण विभागघरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण २०२५ : माझं घर, माझा अधिकार – नव्या महाराष्ट्राची दिशा!

“माझं घर, माझा अधिकार” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये नवीन गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरण जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरण २०३० पर्यंत प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित, सुलभ, शाश्वत आणि सर्वसमावेशक घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवले जात आहे. शहरीकरण, रोजगार, आणि पायाभूत सुविधा यांचा समतोल साधणारे हे धोरण केवळ बांधकाम मर्यादित नसून सामाजिक आणि पर्यावरणपूरक विकासाचं मजबूत माध्यम ठरणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण २०२५ – Gruhnirman Dhoran:

महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्या असलेलं आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत गतिशील राज्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे घरे आणि निवासाच्या गरजा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे शहरी भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या तयार होत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण लोकांचे स्थलांतरही वाढत आहे. कोविड-१९ नंतर घर आणि कामाच्या ठिकाणातील अंतरामुळे स्थायिक निवासाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरण आवश्यक होतं.

मुख्य उद्दिष्टे:

महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण (Gruhnirman Dhoran) २०२५ ची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. सर्वांसाठी घर: २०३० पर्यंत प्रत्येक नागरिकासाठी परवडणारी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक घरे उपलब्ध करून देणे.

  2. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र: झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून निवासमान सुधारणा.

  3. ‘वॉक टू वर्क’ संकल्पना: रोजगार आणि घर यामधील अंतर कमी करून वाहतुकीचा वेळ आणि खर्च घटवणे.

  4. पर्यावरणीय शाश्वतता: हरित तंत्रज्ञान, जलसंधारण, ऊर्जा कार्यक्षमता आणि पुनर्वापर यावर भर.

  5. सामाजिक समावेशकता: ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष गृहनिर्माण प्रकल्प.

धोरणाची तत्त्वे:

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरणात खालील चार प्रमुख तत्त्वांवर भर दिला आहे:

  1. परवडणारी घरे: कमी उत्पन्न गटांसाठी (EWS, LIG) किमान खर्चात घरे मिळावीत यासाठी जमीन, FSI, शुल्क यामध्ये सवलती.

  2. सामाजिक समावेशकता: विशिष्ट घटकांसाठी सुलभ प्रवेश, भाडे तत्वावरील घरे, आणि सुरक्षित निवास.

  3. शाश्वत विकास: बांधकामात पर्यावरणपूरक, मटकाऊ आणि ऊर्जा कार्यक्षम साहित्याचा वापर.

  4. पुनर्निर्माणक्षमता: पूर, उष्णता, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सहन करणाऱ्या इमारती आणि पुनर्बांधणीस सक्षम संकल्पना.

महत्वाच्या धोरणात्मक उपाययोजना:
  1. डेटा आधारित नियोजन: २०२६ पर्यंत राज्यभर गृहनिर्माण गरजांचा सर्वेक्षण (SHIP पोर्टल) व जमीन बँकेची निर्मिती.

  2. EWS व LIG साठी ३५ लाख घरे: २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती.

  3. गृहसंपदा क्षेत्रात गुंतवणूक: ७०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट.

  4. स्वयं-पुनर्विकास व क्लस्टर पुनर्विकास: जुन्या इमारतींच्या सक्षमीकरणासाठी १०% अतिरिक्त FSI व रस्त्यालगतचे प्रोत्साहन.

  5. औद्योगिक कामगार, नोकरदार महिला, विद्यार्थी यांच्यासाठी विशेष घरे: MIDC क्षेत्रात राखीव भूखंड, महाविद्यालयाजवळ हॉस्टेल्स, ऑफिसजवळ घरे.

  6. हरित इमारत धोरण: सौर ऊर्जा, पर्जन्य जल संधारण, ऊष्मा नियंत्रण साहित्य, आणि ग्रीन बिल्डिंग प्रमाणीकरणासाठी प्रोत्साहन.

  7. Ease of Doing Business: एक खिडकी योजना, ऑनलाईन मंजुरी, आणि जलद प्रक्रिया.

  8. CSR चा समावेश: परवडणाऱ्या गृहप्रकल्पात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) चा उपयोग.

  9. गुणवत्ता आणि सुरक्षा: बांधकाम ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदारी थेट विकासकावर, गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती.

अंमलबजावणी आणि सहभाग:

(Gruhnirman Dhoran) धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी MHADA, SRA, म्हाडा, RERA, SPPL अशा विविध शासकीय संस्थांचा सहभाग घेतला आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्था, विकासक, नागरिक, आणि तज्ज्ञ यांच्याशी समन्वय साधून लोकाभिमुख दृष्टिकोन अंगीकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरण-२०२५ हे एक दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख धोरण आहे. यामध्ये केवळ घरं बांधणं हा हेतू नाही, तर सामाजिक न्याय, पर्यावरणीय समतोल, आर्थिक विकास आणि सुरक्षित शहर जीवनशैली घडवण्याचा संकल्प आहे. जर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरण प्रभावीपणे अंमलात आणलं गेलं, तर “सर्वांसाठी घर, सर्वांना सन्मान” ही संकल्पना निश्चितच साकार होईल.

या लेखात, आम्ही महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण (Gruhnirman Dhoran) धोरण विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. घरकुल योजनेसाठी आवासप्लस अ‍ॅपवर सर्वे-नोंदणी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  2. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !
  3. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा !
  4. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 : या लाभार्थ्यांच्या घरकुल अनुदानात 50,000/- रुपये वाढ!
  5. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  6. शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना
  7. “मोदी आवास” घरकुल योजना
  8. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ऑनलाइन नोंदणी
  9. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना – Yashwantrao Chavan Gharkul Yojana
  10. घराचे बांधकाम करताना रस्त्यापासून अंतर हे किती असावे? याबद्दल सविस्तर माहिती!
  11. शासकीय वाळू बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  12. ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस !
  13. डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर !
  14. स्वामित्व योजना म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर !
  15. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
  16. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना) घरकुल अनुदानाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची? जाणून घ्या सविस्तर – PMAY Credit Linked Subsidy Scheme (CLSS Tracker)
  17. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० सुरु!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.