प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 : या लाभार्थ्यांच्या घरकुल अनुदानात 50,000/- रुपये वाढ!
सरकारने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे — घरकुल अनुदानात (Gharkul Anudan) ५०,००० रुपयांची वाढ केली गेली आहे.
“सर्वांसाठी घरे” हे केंद्र शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान योजना राबविण्यात येत आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरीता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने ‘अनुसूचित जाती व नवबौध्द’ घटकांकरीता ‘रमाई आवास योजना’, ‘अनुसूचित जमाती’ करीता ‘शबरी आवास योजना’ व ‘आदिम आवास योजना’ तसेच ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती’ करीता ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना’, ‘इतर मागास वर्ग’ प्रवर्गासाठी ‘मोदी आवास योजना’ इत्यादींचा समावेश आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा-2) – Pradhan Mantri Awas Yojana (PMAY):
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, टप्पा-१ सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी सुरु केला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला १९.६६ लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात (Gharkul Anudan) वाढ करण्याबाबत मा. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे.
वरील बाबी विचारात घेता, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा-२ मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात (Gharkul Anudan) वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.
या लाभार्थ्यांच्या घरकुल अनुदानात 50,000/- रुपये वाढ! Gharkul Anudan:
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-
(१ ) केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ तसेच विविध राज्यपुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत, सन २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात (Gharkul Anudan) राज्य हिश्श्यातून रु. ५०,०००/- एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या रु. ५००००/- रक्कमेमधून रु. ३५०००/- अनुदान (Gharkul Anudan) हे घरकुल बांधकामासाठी तर, रु. १५०००/- इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर १ KW मर्यादेपर्यंत सौर उर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर उर्जा यंत्रणा उभारणी अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान (Gharkul Anudan) अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर उर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील रु. १५०००/- अनुदान (Gharkul Anudan) देय असणार नाही.
(२) राज्यात, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचेकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरीता असलेले दायीत्व पूर्ण करुन यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ ते २०२८-२९ मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
उक्त नमुद बाबी व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १४.१०.२०१६ यामध्ये नमूद केलेल्या इतर सर्व बाबी कायम राहतील.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ हा कार्यक्रम/योजना राबविल्यामुळे, राज्यात शाश्वत विकास ध्येय क्र. ०१ चे लक्ष्य क्र. १.१ हे सन २०३० पर्यंत साध्य करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय :
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 (सन 2024-25 ते सन 2028-29) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या (Gharkul Anudan) अनुदानात राज्य हिश्श्यातून रु. 50,000/- इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा !
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
- शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना
- “मोदी आवास” घरकुल योजना
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ऑनलाइन नोंदणी
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना – Yashwantrao Chavan Gharkul Yojana
- घराचे बांधकाम करताना रस्त्यापासून अंतर हे किती असावे? याबद्दल सविस्तर माहिती!
- शासकीय वाळू बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस !
- डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर !
- स्वामित्व योजना म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर !
- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना) घरकुल अनुदानाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची? जाणून घ्या सविस्तर – PMAY Credit Linked Subsidy Scheme (CLSS Tracker)
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० सुरु!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!