कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेष

शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज दर जाहीर !

“शेतकरी कर्ज” म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी दिले जाणारे कर्ज, हे कर्ज सरकार किंवा बँका विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना देतात. शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या (Farmer Loan Rates) दरांमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. खालील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज दर जाहीर ! Farmer Loan Rates 2025:

सन २०२५-२६ हंगामासाठी पीक कर्जदर, लाख शेती, रेशीम उद्योग व मधुमक्षिका पालन तसेच पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायासाठी खेळते भांडवली खर्चासाठी (Farmer Loan Rates) कर्जदर निश्चित करणेसाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीची दुसरी सभा दिनांक ०६.०३.२०२५ चे इतिवृत्त.

राष्ट्रीय बँकेच्या दि.१५.०४.२०२० रोजीच्या परिपत्रकान्वये सन २०२५-२६ साठी पीक कर्जदर, लाख शेती, रेशीम उद्योग व मधुमक्षिका पालन तसेच पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी कर्जदर (Farmer Loan Rates) निश्चित करणेसाठी राज्यस्तरीय तांत्रिक समिती सभा दि.०६.०३.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. सहकार आयुक्त कार्यालय, पुणे येथे पार पडली. सदर सभेस खालील सदस्य/प्रतिनिधी / निमंत्रित उपस्थित होते.

अ.क्र.प्रतिनिधींचे नाव पद/संस्था
मा.श्री. दिपक तावरेसोमा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा समिती अध्यक्ष
मा.श्री. मनोहर माळीमा. उपनिबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
मा.श्री. वैभव तांबेमा. कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे प्रतिनिधी
डॉ.एस.व्ही.सांभारेमा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे प्रतिनिधी
मा. श्री विजय बा. शिखरेमा. उपआयुक्त, मत्स्य व्यवसाय, पुणे विभाग
मा.श्री. डॉ. प्रदिप परातेमा. सरव्यवस्थापक, राष्ट्रीय बँक, पुणे
मा. श्री. अविनाश तिवारीउपमहाप्रबंधक, नाबार्ड
मा.श्री. दिपक पाटीलमा. समन्व्यक, राज्यस्तरीय बैंकर्स समिती, पुणे, प्रतिनिधी मुख्य व्यवस्थापक
मा. श्री. योगेश पांडुरंग मालुंजकरमा. प्रबंधक, कृषी विभाग, महाराष्ट्र ग्रामीण बँक
१०मा. श्री. दिलीप एन. दिघेव्यवस्थापकीय संचालक, दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बँक लि., मुंबई (सदस्य सचिव)
११डॉ. कविता देशपांडेमा. संचालक रेशीम संचालनालय, नागपूर प्रतिनिधी सहाय्यक संचालक, प्रादेशिक कार्यालय, पुणे
१२मा.डॉ. रोहित निरगुडेमा. प्रतिनिधी महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, राहुरी,
मा.डॉ. दत्तात्रय प. सानप
१३मा.डॉ.बी.मी. साळुंखेमा. प्रतिनिधी पशु वैद्यकिय व मस्त्य विद्यापीठ, नागपूर
१४मा.श्री जितेंद्र देशमुखमा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लि.,
१५मा.श्री. भानुदास भंडारेमा. उपव्यवस्थापक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लि.,

सभेच्या सुरुवातीस राज्यस्तरीय समितीचे सदस्य सचिव, तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, यांनी मा. सहकार आयुक्त तथा समिती अध्यक्ष श्री दिपक तावरेसाहेब यांचे स्वागत केले. तसेच सर्व सन्माननीय समिती सदस्यांचे व निमंत्रितांचेही स्वागत करुन, मा. समिती अध्यक्ष यांना पीककर्ज दर (Farmer Loan Rates) ठरविणेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणेस विनंती केली.

मा. समिती सचिव यांनी चर्चेच्या सुरूवातीस दि.०४.०२.२०२५ रोजीच्या राज्यस्तरीय तांत्रिक समिती सभेत ४१ पीकांचे कर्जदर (Farmer Loan Rates)  निश्चितीबाबत चर्चा झाली. त्यानुषंगाने आजच्या सभेत प्रथम या ४१ पीकांचे दर पुनश्चः चर्चा करुन निश्चित करण्यात आले. त्यावर सर्व उपस्थित प्रतिनिधींनी मा. अध्यक्ष यांनी सहमती दर्शविली. तद्नंतर सन २०२५-२६ या वर्षासाठी उर्वरीत ४४ पीके, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाकरीता खेळत्या भांडवलासाठीचे दर निश्चित करण्यासाठी चर्चा झाली.

सदर चर्चेत पीकनिहाय (Farmer Loan Rates) कर्जदर तसेच खेळते भांडवली कर्जदर ठरविणे अनुषंगाने मा. अध्यक्ष,, कृषि विभागाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय बँक, राज्यस्तरीय बँकर्स कमिटी, पशुसंवर्धन विभागाचे प्रतिनिधी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रतिनिधी, ग्रामीण बँकांचे प्रतिनिधीं, कृषि विद्यापिठांचे प्रतिनिधी, रेशीम संचलनालयाचे प्रतिनिधी, जळगांव व सातारा जिल्हा बँकांचे प्रतिनिधी यांनी चर्चेत सहभाग घेवून, पीक कर्जदर तसेच खेळते भांडवली कर्जदर निश्चित करण्यात आले.

दरम्यान मा. अध्यक्ष यांनी सर्व उपस्थित सदस्यांना याअनुषंगाने काही मत मांडावयाचे असल्यास किंवा काही फरक दर्शवयाचा असल्यास त्यांनी सभेत मांडणेसंदर्भात सुचना केल्या. त्यावर उपस्थित सदस्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नसल्याने, सर्वानुमते पीकनिहाय किमान व कमाल कर्जदर (Farmer Loan Rates) तसेच खेळते भांडवली (Farmer Loan Rates) कर्जदर निश्चित करण्यात आले. त्याचा तपशिल सोबत जोडला आहे.

मा.सदस्य सचिव यांनी जिल्हास्तरीय तांत्रिक समिती (DLTC) समेत जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या पीकांचे उत्पादन, उत्पादन खर्च, प्रति हेक्टरी मिळणारे उत्पादन, मिळणारे उत्पन्न, स्थानिक बाजारपेठेत मिळणारा दर, पिकांची आर्थिक फलप्रदता (Viability) इत्यादी बाबी विचारात घेवून, जिल्हा बँकांनी कर्जदर (Farmer Loan Rates) निश्चित करावेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय बँकेकडून सुधारित परिपत्रक प्रसूत करणेची कार्यवाही व्हावी लागेल, असे मत व्यक्त केले. त्यास मा. अध्यक्ष यांनी सहमती दर्शविली.

मा.सदस्य सचिव तथा दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर सभेस उपस्थित राहून पीक (Farmer Loan Rates) कर्जदर ठरविण्यास्तव मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल सभा अध्यक्ष मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आभार मानले. तसेच सदर सभेत कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी, कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व ग्रामिण बँकांचे प्रतिनिधी, रेशीम संचालनालय पशुसंवर्धन/मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाचे प्रतिनिधी व जिल्हा बँकांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहून पीककर्ज दर (Farmer Loan Rates) ठरविण्यात सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानून मा. अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

SLTC Fixed Scale Of Finance For The Year 2025-26
(Rupees per Hectare)
SR. No.CROPSOF-Rate Fixed by SLTC for 2025-26
MiniMaxi
KHARIP
1KHARIP PADDY/IMPROVED6800082500
2KHARIF PADDY (SUMMER/BASMATI)6850082500
3KHARIP PADDY6100081250
4KHARIP JAWAR (I)3600056000
5KHARIP JAWAR (U)3300051000
6BAJRA (I)3800054000
7BAJRA (U)3200049000
8BAJRA SUMMER2800036000
9MILET (Ragi, Warai, Rajgira)4000050000
10MAIZE (I)4500065000
11MAIZE (U)3600048000
12MAIZE (SWEET CORN)3600048000
13TUR (I)5200065000
14TUR (U)4700054000
15MUNG (U)2800032000
16MUNG (SUMMER)2800032000
17UDID(U)2500034000
18GROUNDNUT (I)5000062000
19GROUNDNUT (U)4500060000
20SOYABIN5800075000
21SUNFLOWER (I)3000042000
22SUNFLOWER (U)2700040000
23SEASAME (U)2700036000
24LINSSEED (I)2700036000
25COTTON (I)6500085000
26COTTON (U)6000075000
27HIGH DENSITY PLANTING SYSTEM (HDPS) (COTTON)9200092000
28SUGARCANE (ADSALI)165000180000
29SUGARCANE (PRE-SEA)145000170000
30SUGARCANE (SURU)145000170000
31SUGARCANE (RATOON)125000160000
RABBI/SUMMERCROP
32RABBI JAWAR (I)3600054000
33RABBI JAWAR (U)3600054000
34WHEAT (I)4500060000
35GRAM (I)4500060000
36GRAM (U)3600046000
37SAFFLOWER2700043000
VEGETABLE CROP
38CHILLI85000120000
39TOMATTO96000135000
40KHARIP ONION68000100000
41RABBI ONION90000120000
42POTATO85000110000
43TURMERIC130000170000
44GINGER110000160000
45CABBAGE4500060000
46GARLIC7200080000
FLOWER CROP
47ASHTER5000060000
48CHRYSANTHEMUM5000066000
49ZENDU5000066000
50ROSE5000065000
51JASMINE5000060000
52MOGRA5000060000
53NISHIGANDHA5000090000
FRUIT CROPS
54GRAPES375000500000
55CASHEW165000193000
56PAMOGRANNET160000230000
57SAPOTA100000125000
58GUAVA75000100000
59LIME80000110000
60COCONUT120000180000
61CUSTARD APPLE70000100000
62ΒΑΝΝΑΝΑ115000160000
63 BANNANA (TISSU CULTURE)150000200000
64ORANGES/CITRUS LIME100000150000
65MANGO (HAPUS)200000250000
66MANGO(KESAR)180000240000
67BOR4500060000
68AMLA4500060000
69FIG90000165000
70PAPAYA80000100000
71DRAGON FRUIT100000180000
72STRAWBERRY NORMAL180000450000
73STRAWBERRY VERTICAL260000540000
74PINEAPPLE7500080000
FODDER CROP
75GAJARAJ4000063000
76GARLIC GRASS6000085000
77SEHIMA GRASS5500075000
78MAIZE (GREEN GRASS)4000050000
79BAJRA (GREEN GRASS)2000025000
80JAWAR (GREEN GRASS)2500040000
81NEPIER GRASS4200050000
OTHER CROPS
82SILK MULBERY140000185000
83SILK WORM140000185000
84LAC FARMING85000100000
85HONEY BEE REARING (PER 10 BOX)90000100000
86PANMALA75000100000
पशुसंवर्धन व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी निश्चित केलेले दर (Animal husbandry Farmer Loan Rates) :
सन २०२५-२६ साठी पशुसंवर्धन व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी निश्चित केलेले दर (Farmer Loan Rates)
(रुपयात)
अ. क्र.व्यवसायाचे नावसन २०२५-२६ करिता राज्य स्तरीय समितीने पशुसंवर्धन व्यवसायासाठी निश्चित केलेले कर्जदर (तिमाही)
किमानकमाल
पशु पालन / दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन खर्च कर्जदर
युनिट १ गाय१५,०००३५,२००
युनिट १ म्हैस१५,०००४१,८००
शेळी/मेढी पालन व्यवस्थापन खर्च कर्जदर
युनिट १०+११४,०००३८,५००
कुकुटपालन व्यवस्थापन खर्च कर्जदर
युनिट १०० पक्षी
बॉयलर६,३००३५,२००
लेयर६,३००५१,७००
गावठी७,४००५१,१५०
मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी निश्चित केलेले दर (Fisheries Business Farmer Loan Rates):
सन २०२५-२६ साठी मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी निश्चित केलेले दर
(रुपयात)
अ. क्र.व्यवसायाचे नावसन २०२५-२६ करिता राज्य स्तरीय समितीने मत्स्य व्यवसायासाठी निश्चित केलेले कर्जदर
किमानकमाल
प्रती हेक्टर शेततळे सर्वजाती मत्स्य पालन३,००,०००५,००,०००
नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने५०,०००८०,०००
निम्न खारे पाण्यातील मत्स्य पालन प्रति हेक्टर सर्वजाती३,००,०००५,००,०००
निम्न खारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रती हेक्टर (माशाच्या इतर जातीसह)३,००,०००५,००,०००
टॉलर मच्छिमार नौका३,००,०००५,००,०००
पर्सिसीन मच्छिमार नौका३,००,०००५,००,०००
गील नेटर मच्छिमार नौका३,००,०००५,००,०००
बिगर यांत्रिक मच्छिमारी नौका८०,०००९०,०००
यांत्रिक मच्छिमारी नौका१,५०,०००२,००,०००
१०शोभिवंत मत्स्य पालन (रु.३ लाख भांडवली किंमत)१,००,०००१,५०,०००
११शोभिवंत मत्स्य पालन (रु.८ लाख भांडवली किंमत)१,५०,०००१,६५,०००
१२शोभिवंत मत्स्य पालन (रु.२५ लाख भांडवली किंमत)३,५०,०००५,००,०००
१३गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय२,००,०००३,००,०००
१४पिंजरा पध्दतीने मत्स्य पालन (प्रति पिंजरा)५०,०००६०,०००

या लेखात, आम्ही शेतकऱ्यांसाठी नवीन (Farmer Loan Rates) कर्ज दर जाहीर ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  2. शेतकऱ्यांना मिळणार ५ मिनिटांत पीक कर्ज, आरबीआय-नाबार्ड सोबत करार!
  3. शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का कमी व्याज दराने अर्थसहाय्य !
  4. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश !
  5. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा !
  6. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  7. कृषी कर्ज मित्र योजना – Krishi Karj Mitra Yojana
  8. बँकेचे कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान !
  9. किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.