पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
पीक कर्जासाठी (Peek Karj) ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन बैठका पार पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लक्षांक निश्चित करून कर्ज वाटपासाठी आता सुरवात झालेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पीक कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर दिसत नसतील तर लवकरच तो पर्याय दिसेल किंवा सर्च टॅब मध्ये “पीक कर्ज” असे सर्च करा, पुढे तुम्हाला पीक कर्जाची लिंक मिळेल.
पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Peek Karj Online application process:
प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आणि तुम्हाला डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे. मी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गूगल मध्ये अहमदनगर लिहिणार आहे.
आता आपण इथे खालील अहमदनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळाची लिंक ओपन करणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यावर त्यामध्ये वर सर्व प्रथम आपली मराठी भाषा निवडा. नंतर पुढे “नवीन काय” या नोटिफिकेशन पर्यायामध्ये “अहमदनगर जिल्हा) पीक कर्जासाठी अर्ज” या पर्यायावर क्लिक करा किंवा सर्च टॅब मध्ये “पीक कर्ज” असे सर्च करा, पुढे तुम्हाला पीक कर्जाची लिंक मिळेल.
अहमदनगर जिल्हा) पीक कर्जासाठी अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे “पीक कर्ज (केसीसी) साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्यामध्ये ओके बटन वर क्लिक करा.
पीक कर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज ऑनलाईन गूगल फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.
ऑनलाईन अर्जामध्ये दाखवल्या प्रमाणे खालील माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
या अर्जामध्ये अर्जदारास आपला ईमेल, शेतकऱ्याचे पूर्ण नाव (पहिले /मधले /आडनाव ), जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, तालुका, गावाचे नाव, आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक कर्जखात्याची माहिती, कर्ज असेल तर कर्जाचे खाते क्रमांक, कर्जाचा प्रकार, कर्जाची रकम (लक्ष/रु), कर्ज खात्याचा प्रकार, अर्जदारांची संख्या, बँकेचा बचत खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँकेची शाखा, सर्वे / गट क्रमांक, क्षेत्र ( हेक्टर आर मध्ये ), लागवड करण्याच्या पिकाची माहिती, पिकाचे नाव, क्षेत्र *( हेक्टर आर मध्ये ), दुसऱ्या बँके मध्ये कर्ज आहे का ?, आणि अर्जाची तारीख इत्यादी तपशील आपल्याला भरायचा आहे.
सूचना :
- अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल. त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
- पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल. फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
- कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.
पीक कर्ज मागणीसाठी ऑफलाईन अर्ज:
पीक कर्ज मागणीसाठी ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!