आपले सरकार - महा-ऑनलाईनउद्योगनीतीवृत्त विशेषसरकारी कामे

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती – Food Licence Registration Online Apply

FSSAI – भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे. ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.

FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. FSSAI फूड लायसन्स नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे. आपण या लेखात FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) ऑनलाईन कसे काढायचे? याची  सविस्तर माहिती पाहणार आहोत.

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) कोणासाठी आवश्यक आहे ?

 • डेअरी युनिट
 • तेल प्रोसेसिंग युनिट
 • कत्तलखाना मांस प्रक्रिया युनिट
 • रिपॅकर्स आणि Relabellers
 • मॅनुफॅक्चरर किंवा अन्न प्रक्रिया युनिट
 • स्टोरेज यूनिट
 • घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार
 • ढाबा,खानावळ, क्लब/कँटीन,
 • अन्न कॅटरिंग,
 • हॉटेल,उपहारगृह Restaurant
 • खाद्यपदार्थ दुध वाहतुक
 • विपणक/बाजार
 • फेरीवाला
 • निर्यातकार आणि आयातकार
 • ईकॉमर्स/ऑनलाईन अन्न वितरण
 • फास्ट फूड,चायनीज सेंटर

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) साठी आवश्यक कागदपत्रे:

 • आधार कार्ड/पॅन कार्ड.
 • पासपोर्ट साईज फोटो.
 • पत्ता पुरावा (लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट.

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) पात्रता निकष आणि शुल्क रचना:

FSSAI फूड लायसन्स / फूड परवाना / FSSAI नोंदणी पात्रता निकष आणि शुल्क रचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) काढण्याची ऑनलाईन प्रोसेस:

फूड लायसन्स काढण्यासाठी खालील FSSAI – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://foscos.fssai.gov.in

वेबसाईट ओपन केल्यानंतर पुढे वेबसाईट स्क्रोल करून खालील Apply License/Registration Fee: Rs.100 to 7500 per year या पर्यायावर क्लिक करा.

Apply License/Registration
Apply License/Registration

Apply License/Registration वर क्लिक केल्यानंतर पुन्हा Apply For License/Registration वर क्लिक करा.

Apply For License-Registration
Apply For License-Registration

पुढे आपले महाराष्ट्र राज्य निवडा, आणि ज्या प्रकारामध्ये फूड लायसन्स काढायचे आहे तो प्रकार निवडा. खालील प्रमाणे FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणीसाठी ५ मुख्य प्रकार आहेत.

१) Manufacturer – (उत्पादक):

दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला तेल, मांस उत्पादने, उपन्यास अन्न उत्पादने आणि रिपॅकर्ससह सर्व अन्न प्रक्रिया युनिट्सचे उत्पादन/प्रक्रिया केल्यास.

२) Trade/Retail – (व्यापार/किरकोळ):

जर स्टोअरिंग, होलसेलिंग, रिटेलिंग, डिस्ट्रीब्यूशन, ट्रान्सपोर्टिंग, फूड वेंडिंग एजन्सीज, सप्लाय, मार्केटिंग इ.

३) Food Services – (अन्न सेवा):

ताजे अन्न आणि पेये तयार करणे आणि देण्याशी संबंधित अन्न क्रियाकलापांमध्ये गुंतलेले व्यवसाय.

४) Central Govt. Agencies – (केंद्र सरकार एजन्सी):

जर फूड बिझनेस अॅक्टिव्हिटीज चालवल्या जातात म्हणजे अन्न कॅन्टीन/केटरिंग सेवा, साठवण, घाऊक विक्री, किरकोळ विक्री, केंद्र सरकारमध्ये अन्न उत्पादनांचे वितरण.

५) Head Office – (मुख्य कार्यालय):

जर एकाच कंपनी/संस्थेच्या नावाने एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये अन्न व्यवसाय क्रियाकलाप करत असतील.

Select Kind of Business
Select Kind of Business

टीप: प्रत्येक स्थानाला स्वतंत्र परवाना दिला जाईल (ट्रान्सपोर्टर वगळता जेथे एकाच वाहतूकदार/ व्यवसायाच्या सर्व वाहनांसाठी एक परवाना दिला जाईल). जर एफबीओचे एकापेक्षा जास्त राज्यात स्थित परिसर/युनिट असेल तर, फूड बिझनेस ऑपरेटर (FBO) ला मुख्य कार्यालय म्हणून एक परिसर घोषित करावा लागेल आणि पात्रता निकषांनुसार (केंद्रीय किंवा राज्य परवाना किंवा नोंदणी) मुख्य कार्यालयासाठी केंद्रीय परवाना आणि इतर स्थानासाठी स्वतंत्र परवाना मिळवावा लागेल.

आपण इथे किराणा माल दुकानाचे फूड लायसन्स काढणार आहोत, तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार फूड लायसन्स काढा. किराणा माल दुकान हे Retailer प्रकारा मध्ये इथे म्हणजे किरकोळ ही एक क्रिया आहे जिथे अन्न उत्पादक, वितरक किंवा घाऊक विक्रेत्याकडून खरेदी केले जाते आणि अंतिम वापरकर्त्याला विकले जाते.

किराणा माल दुकानाचे फूड लायसन्स काढण्यासाठी आपण इथे Trade/Retail – (व्यापार/किरकोळ) या प्रकारा मध्ये विविध प्रकार आहेत त्यामध्ये Retailer वर क्लिक करणार आहे.

Retailer वर क्लिक केल्यानंतर खालील तीन प्रकारच्या व्यवसाय उलाढालीनुसार पर्याय निवडा. मी इथे Turnover up to 12 lakhs/annum हा पर्याय निवडणार आहे आणि Proceed वर क्लिक करा.

 • Turnover greater than 20 crores/annum (20 कोटी/वार्षिक पेक्षा जास्त उलाढाल)
 • Turnover upto 20 crores/annum (20 कोटी/वार्षिक पर्यंत उलाढाल)
 • Turnover up to 12 lakhs/annum (12 लाख/वार्षिक पर्यंत उलाढाल)
Turnover up to 12 lakhs/annum
Turnover up to 12 lakhs/annum

निवडलेल्या व्यवसायाचे प्रकार आणि प्रदान केलेल्या इनपुटचे मूल्यांकन केल्यानंतर, पुढे Click here to apply for Registration for all businesses वर क्लिक करा.

Click here to apply for Registration for all businesses
Click here to apply for Registration for all businesses

Form “A”:

आता Form “A” ची नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये योग्य नोंदणी प्रमाणपत्र तपशील भरा.

 • अर्जदार तपशील मध्ये अर्जदाराचे / कंपनीचे नाव, वैयक्तिक भागीदार मालक सहकारी संस्था इतर माहिती.
 • जिथे फूड व्यवसाय आहे त्या परिसरांचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता आणि संपर्काची माहिती.
 • किती वर्षांसाठी तुम्ही अर्ज करू इच्छिता ते निवडा.
 • उत्पादित किंवा विक्रीसाठी प्रस्तावित अन्नपदार्थांचा तपशील माहिती. टीप: FoSCoS वर उपलब्ध यादीनुसार केवळ प्रमाणित अन्न उत्पादनांची निर्मिती करण्याची परवानगी आहे.]
Form "A"
Form “A”

वरील तपशील भरल्यानंतर आणि इतर तपशील मध्ये व्यवसायाच्या बाबतीत सुरू होण्याची इच्छित तारीख, पाणी पुरवठ्याचे स्त्रोत, अन्नपदार्थांच्या निर्मितीमध्ये कोणतीही विद्युत शक्ती वापरली जाते का? याची माहिती भरा आणि Save & Next वर क्लिक करा.

Save & Next
Save & Next

Save & Next वर क्लिक केल्यानंतर Sign Up Details चे पेज येईल त्यामध्ये लॉगिन आयडी/ पासवर्ड तयार करण्यासाठी संपूर्ण आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा. आपला लॉगिन आयडी/ पासवर्ड सेव्ह करून ठेवा जेणे करून पुन्हा लॉगिन करून अप्लिकेशनची स्टेट्स चेक करू शकतो आणि FSSAI फूड लायसन्स डाउनलोड करू शकतो.

आता पुढे संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करून Preview Application वर क्लिक करून आपला संपूर्ण अर्ज तपासा, जर माहिती चुकीची असेल तर एडिट करून पुन्हा योग्य माहिती भरा.

संपूर्ण अर्ज तपासल्यानंतर Pay या पर्यायावर क्लिक करून फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, एक पावती येईल ती डाउनलोड करा आणि त्यामधील अँप्लिकेशन आयडी नोट करून ठेवा.

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) अप्लिकेशन स्टेट्स चेक करा – (Track FSSAI Food Licence Application):

फूड लायसन्सचे अप्लिकेशन स्टेट्स चेक करण्यासाठी खालील FSSAI – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://foscos.fssai.gov.in

वेबसाईट ओपन केल्यानंतर पुढे Track Application मध्ये आपला अर्ज संदर्भ क्रमांक म्हणजेच Application Reference No टाका आणि कॅप्चा कोड (Captcha Code) प्रविष्ट करून सबमिट बटनवर क्लिक करा.

Track Application
Track Application

अशा प्रकारे तुम्ही फूड लायसन्सचे स्टेट्स चेक करू शकता. या अप्लिकेशन प्रोसेससाठी किमान १० ते १२ दिवस लागू शकतात.

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) डाउनलोड करा: (Download FSSAI Food Licence)

FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) अप्लिकेशन ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर १० ते १२ दिवसानंतर खालील लिंक वर क्लिक करून FSSAI – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईट ओपन करा.

https://foscos.fssai.gov.in/public/

वेबसाईट ओपन झाल्यानंतर Small (Petty) FBO Sign-In मध्ये युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.

Small (Petty) FBO Sign-In!
Small (Petty) FBO Sign-In!

आता Issued या पर्यायामध्ये Issued Registration Certificate वर क्लिक करून FSSAI फूड लायसन्स अप्लिकेशन नंबर वर क्लिक करा आणि FSSAI फूड लायसन्स डाउनलोड करा. हे FSSAI फूड लायसन्स डाउनलोड केल्यानंतर प्रिंट करून आपल्या शॉप मध्ये लावा.

संपर्क: 1800 222 365 / 1800112100 ईमेल : jc-foodhq@gov.in / helpdesk-foscos@fssai.gov.in

हेही वाचा – घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.