कृषी योजनावृत्त विशेष

प्रति थेंब अधिक पिक योजना; शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब, अधिक पिक’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. याच घटकासाठी मुख्यमंत्री शाश्र्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पुरक अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. याच घटकासाठी जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 35 टक्के पुरक अनुदान इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान दिले जाते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 35 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान दिले जाते.

योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्याकडे मालकी हक्काचा सातबारा, 8 अ व ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक राहिल.

हेही वाचा – अन्न व पोषण सुरक्षा अभियानात विविध बाबींसाठी अनुदान

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.