प्रती थेंब अधिक पीक योजना – महाडीबीटी सिंचन योजना
पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन (Prati Themb Adhik Peek Yojana). या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.
ती थेंब अधिक पीक योजना – महाडीबीटी सिंचन योजना – Prati Themb Adhik Peek Yojana:
तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.
योजनेचे स्वरुप :
पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवणे व सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे हा योजने मागचा उद्देश आहे.
योजनेच्या अटी :
1) शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काचा ७/१२ व ८ अ उतारा असावा.
2) सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी.
3) सूक्ष्म सिंचन संच घटकाचे आयुर्मान ७ वर्षे करण्यात आले आहे. ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभधारकास ७ वर्षानंतर पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेता येईल.
4) शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करुन आधार क्रमांकाचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे.
5) शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
आवश्यक कागदपत्रे :
1) अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी सवर्ग प्रमाणपत्रे.
2) पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3) सूक्ष्म सिंचन संच खरेदी केल्यानंतर शेतकरी हमी पत्र, देयकाची मूळ प्रत आणि कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र.
4) ७/१२, ८-ए प्रमाणपत्र
5) वीज बिल
6) खरेदी केलेल्या संचाचे बिल
7) पूर्वसंमती पत्र
योजनेअंतर्गत लाभ :
1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देय राहील.
2) अर्थसाहाय्य केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के असे आहे.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!