वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

मागेल त्याला योजना : फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर

राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना उद्भवणाच्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषि विभागामार्फत (Magel Tyala Yojana) महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध घटकांचा लाभ देण्यात येतो.

मागेल त्याला योजना – Magel Tyala Yojana:

शेतकऱ्यांना आवश्यक असणारा घटक / बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून, आता मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र (BBF) व कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

मागेल त्याला फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर:

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले घटक मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला (Magel Tyala Yojana) फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्यात येईल. शेतकऱ्यांना सदर घटक/ बाब कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रचलित योजनांतर्गत व त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

अ.क्र.घटक / बाबकृषि विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या प्रचलित योजना
मागेल त्याला फळबागएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
मागेल त्याला ठिबक/तुषार सिंचनराष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)
मागेल त्याला शेततळेमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरणराष्ट्रीय कृषि विकास योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
मागेल त्याला शेडनेट / हरितगृहमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
राष्ट्रीय कृषि विकास योजना
मागेल त्याला आधुनिक पेरणीयंत्रे (Broad Bed and Furrow BBF) आणि कॉटन श्रेडरकृषि यांत्रिकीकरण उपअभियान
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना

उपरोक्त घटक हे ज्या कृषि योजनांतर्गत अनुज्ञेय आहेत, त्या योजनांचे विहित निकष व योजनांच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या आर्थिक वर्षातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याची कार्यवाही महाडीबीटी पोर्टलद्वारे करावी.

उपरोक्त घटकांसाठी अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे वर्ग करण्यात यावे.

या योजनेंतर्गत लाभ देताना अर्जदाराने शेतकऱ्याने मागणी केलेल्या घटकाचा यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेतलेला असणार नाही याची खातरजमा करावी.

उपरोक्त घटकांच्या वाटपासाठी आवश्यक निधी आर्थिक वर्षाकरीता संबंधित प्रचलित योजनेमधून उपलब्ध करून दिलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून भागवावा व उपरोक्त घटकांच्या मागणीनुसार अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याकरिता मागणी करावी.

सदर योजनेची कृषि विभागामार्फत आर्थिक वर्षाकरीता अंमलबजावणी करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी क्षेत्रीय स्तरावर करावी.

आयुक्त (कृषि) यांनी उपरोक्त बाबत क्षेत्रिय स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात व आयुक्त (कृषि) यांनी याबाबत नियमितपणे आढावा घ्यावा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय – Magel Tyala Yojana GR :मागेल त्याला फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “मागेल त्याला योजना : फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर

  • Shailesh popatrao sabare

    पूर्व संमती ची अट ठेवण्यात येऊ नये.कारण शेतकरी बंधू अर्ज करतात ती तारीख व त्यांचा ऑनलाईन लॉटरी पद्धतीने नंबर जेव्हा केव्हा येईल त्या नंतर कागदपत्र अपलोड करून छाननी करण्यात येते.मग पूर्व संमती दिली जाते.मग शेतकरी बंधू त्याला योजनेत समाविष्ट असलेली बाब खरिदी करावी अशी अट ठेवण्यात येते.ते नको.कारण शेतकरी गरजेनुसार वेळीच बाब अनुदानातून खरीदी करून त्याला अनुदान मिळावे.अशी विनंती.मागील वर्षी हजारो शेतकरी बंधू नी अर्ज केले आहे.त्यांचे अद्याप लॉटरी पद्धतीने नंबर लागला नाही.ते अनुदानाचा लाभ गेहू शकत नाही.त्यामुळे अर्ज केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत शेतकरी बंधू नी माल विकत घेऊन बिल upload करावे अशी सोय असावी.ज्यांना लाभ gaycha आहे ते लाभा साठी पात्र आहे की नाही याची खात्री कृषी विभाग कडून नियमाने करून मग अर्ज करण्यात यावा.किंवा अर्ज केल्यावर आठ दिवसात त्याची छाननी करण्यात यावी.अशी विनंती.यामुळे योजना 100% यश सवी होईल.असे वाटते.ही सूचना .आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.