व्याज परतावा योजना अर्ज सुरु
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तिंना स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक, शैक्षणिक, बचतगट व थेट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
या व्याज परतावा योजनेमध्ये बॅककडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12 टक्क्यापर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला असून याचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत.
महामंडळाच्या विविध कर्ज योजना:
१. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना-
बँकेमार्फत लाभार्थ्यांस व्यवसायासाठी रुपये 10 लाखापर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची 12 टक्केच्या मर्यादेत रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येते.
२. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना-
बँकेमार्फत विद्यार्थ्यास उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रुपये 10 लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी रुपये 20 लाख इतके कर्ज वितरीत करण्यात येते. कर्जावरील व्याजाची 12 टक्केच्या मर्यादेत रक्कम महामंडळाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येते.
३. गट कर्ज व्याज परतावा योजना-
बँकेमार्फत बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, इत्यादींना व्यवसायासाठी 15 लाख रुपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची 12 टक्केच्या मर्यादेत रक्कम महामंडळाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येते.
४. थेट कर्ज योजना-
महामंडळाकडून लाभार्थ्यांस व्यवसायासाठी रुपये 1 लाखापर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज भरावे लागणार नाही.
या योजनेचा इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजु व्यक्तींनी लाभ घ्यावा.
हेही वाचा – दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू.५/- इतके अनुदान
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!