इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दिनांक १४/०८/२००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संदर्भ क्र.२ व ३ येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. सदर योजना राबविताना अडचणी येत असल्याचे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे सदर योजनेबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना :-
आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकीत शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board ) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (C.B.S.E. Board) मधून गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणाऱ्या ५ मुले व ५ मुली तसेच राज्यातील ९ विभागीय शिक्षण मंडळामध्ये प्रत्येक शिक्षण मंडळात प्रथम येणाऱ्या ३ मुले व ३ मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सैनिकी शाळा, नामांकीत शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे मुले व मुली.
इयत्ता १० वी | इयत्ता १२ वी | ||||||
कला | वाणिज्य | विज्ञान | |||||
मुले | मुली | मुले | मुली | मुले | मुली | मुले | मुली |
5 | 5 | 5 | 5 | 5 | 5 | 5 | 5 |
इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च ( S.S.C. Board)
प्राविण्य क्रमांक | बक्षीस रक्कम (₹) |
प्रथम | ३०,०००/- |
द्वितीय | २५,०००/- |
तृतीय | २०,०००/- |
चतुर्थ | १५,०००/- |
पाचवा | १०,०००/- |
एकूण | १,००,०००/- |
इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली या ८ गटांसाठी येणारा एकूण खर्च ₹८,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. (S.S.C. Board)
नामांकीत शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल मधून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( C.B.S.E.) मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे मुले व मुली.
इयत्ता १० वी | इयत्ता १२ वी | ||||||
कला | वाणिज्य | विज्ञान | |||||
मुले | मुली | मुले | मुली | मुले | मुली | मुले | मुली |
5 | 5 | 5 | 5 | 5 | 5 | 5 | 5 |
इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च (C.B.S.E..Board)
प्राविण्य क्रमांक | बक्षीस रक्कम (₹) |
प्रथम | ३०,०००/- |
द्वितीय | २५,०००/- |
तृतीय | २०,०००/- |
चतुर्थ | १५,०००/- |
पाचवा | १०,०००/- |
एकूण | १,००,०००/- |
इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली या ८ गटांसाठी येणारा एकूण १८,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. (C.B.S.E.. Board)
राज्यस्तरावर प्रावीण्य अनुदान :- उक्त परिच्छेद २ व ३ मधील एकूण १६ गटांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹१,००० याप्रमाणे १० महिन्यांकरिता ८० ( ८X५=४० + ८X५ = ४० ) लाभार्थी विचारात घेता, ₹१,००० X १० महिने X ८० लाभार्थी – = ₹८,००,०००/- असे एकूण S.S.C. Board व C.B.S.E. Board येथून राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे एकूण ८० विद्यार्थ्यांकरिता एकूण ₹८,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे.
महाराष्ट्र राज्यात ९ विभागीय मंडळे असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) येथून प्राविण्य मिळविणाऱ्या एका विभागीय मंडळातील इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली.
इयत्ता १० वी | इयत्ता १२ वी | एकूण लाभार्थी | ||||||
कला | वाणिज्य | विज्ञान | ||||||
मुले | मुली | मुले | मुली | मुले | मुली | मुले | मुली | 24 |
3 | 3 | 3 | 3 | 3 | 3 | 3 | 3 |
इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च (S.S.C. Board)
प्राविण्य क्रमांक | बक्षीस रक्कम (₹) |
प्रथम | २५,००० |
द्वितीय | १५,००० |
तृतीय | १०,००० |
एकूण | ५०,००० |
इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली या ८ गटांसाठी येणारा एकूण खर्च ₹४,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. ( S.S.C. Board)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( C.B.SE. Board ) यांची विभागीय मंडळे नसल्याने ते वगळून उक्त परिच्छेद ५ मधील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) येथील एका विभागीय मंडळातील १० वी व १२ वी (कला, वाणिज्य व विज्ञान शाखा) मधील ८ गटांकरिता येणारा खर्च ५०,००० × ८ = ₹४,००,००० इतका खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र = राज्यातील ९ विभागीय मंडळांकरिता येणारा खर्च ₹४,००,००० X ९ = ₹३६,००,००० इतका खर्च = अपेक्षित आहे.
विभागीय मंडळे प्रावीण्य अनुदानासाठी तरतूद –
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( C.B.SE. Board) यांची विभागीय मंडळे नसल्याने ते वगळून एका विभागीय मंडळातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( S.S.C. Board) मधील २४ विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात येणार असून ९ विभागीय मंडळात एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या २४९ = २१६ इतकी असून त्यांना प्रतिमाह ₹१००० याप्रमाणे x १० महीन्याकरिता ₹२१,६०,००० इतका खर्च अपेक्षित आहे.
सदर योजनेसाठी एकूण ₹१,००,००,००० ( रुपये एक कोटी मात्र) इतका अंदाजित वार्षिक खर्च अपेक्षित असून प्रस्तुत योजनेसाठी येणारा खर्च मागणी क्रमांक टी-४, २२२५ – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, जनजाती क्षेत्र उपयोजना, ०२-अनुसूचित जमातींचे कल्याण, २७७-शिक्षण, (१२) १० वी व १२ वी मधील शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना (१२) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२२५-३४१-१) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
सन २०१९-२० व २०२०-२१ या कालावधीत कोविड-१९ च्या प्रादुर्भाव असल्याने या दोन वर्षासाठी सदर योजना न राबविता सन २०२२-२३ पासून राबविण्यात यावी.
एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर सर्वांना त्या क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम देण्यात यावी.
आदिवासी विकास विभाग शासन निर्णय : इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लीक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!