कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सुरु ! Krushi Avajare Bank
कृषि विभागामार्फत सन 2022-2023 साठी कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत आकांक्षित जिल्ह्याकरीता कृषि यांत्रिकीकरण उपअभियानामधील घटक क्रमांक सहा नुसार कृषि औजारे बँक स्थांपन करण्यासाठी शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांनी 9 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.
कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चत्तम मर्यादा 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांस डीबीटी प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येईल.
योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज 9 डिसेंबर 2022 पर्यत अर्ज सादर करावे. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
कृषि विभाग अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!