वृत्त विशेष

महावितरणकडून वीजेची दरवाढ, प्रतियुनिट १५ ते ५२ टक्क्यांनी वाढ; घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना भुर्दंड

घरगुती वीजग्राहकांबरोबरच शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांनाही महावितरणने वीज दरवाढीचा ‘शॉक’ दिला. त्याबरोबरच वीज देयकाच्या स्थिर आकारातही मोठी वाढ केली आहे. यानुसार विजेच्या सध्याच्या दरात प्रतियुनिट किमान १५ ते कमाल ५२ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही नवीन दरवाढ सोमवारपासून (ता. १) लागू झाली आहे.

वीज वापरावरून १० पैसे व ७० पैसे दरवाढ करण्यात आली आहे. डिसेंबरच्या बिलापासून ही दरवाढ लागू होणार आहे. या वीज बिलवाढीचा फटका नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारसह महावितरणच्या विभागातील ग्राहकांना बसेल.

दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना वीज देयकांपोटी दरमहा १०० ते ५०० रुपयांचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

लघुदाब उपगटांत मोडणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेसाठी प्रतियुनिट चार रुपये ५६ पैसे, तर अन्य शेतीच्या कामासाठीच्या विजेसाठी प्रतियुनिट सहा रुपये ८८ पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ अनुक्रमे ३८.१८ आणि ४८.२८ टक्के आहे. उच्चदाब उपगटातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी प्रतियुनिट सहा रुपये ३८ पैसे आणि शेतीच्या अन्य कामांसाठी प्रतियुनिट आठ रुपये ५९ पैसे वीज दर असणार आहेत. ही दरवाढ अनुक्रमे ५०.४७ टक्के आणि ५२.०३ टक्के इतकी आहे.

>

वीज कंपन्यांची अकार्यक्षमता आणि गळतीमुळे झालेला तोटा भरून काडण्यासाठी दरवाढ करणे, ही भिनलेली सरकारी मनोवृत्ती आहे. ही दवाढ म्हणजे सरकारी मनोवृत्तीचा वीजग्राहकांवर टाकलेला बोजा आहे.

शेतकरी

  • शेती पंप (लघुदाब): प्रतिअश्वशक्ती : ५२ रुपये
  • शेतीच्या अन्य कामांसाठी प्रतिअश्वशक्ती : १४२ रुपये
  • शेती पंप (उच्चदाब) प्रतिकिलोवॉट अँपिअर : ९७ रुपये

व्यापारी

  • दरमहा प्रत्येकी ५१७ रुपये

उद्योजक (लघुदाब गट)

  • शून्य ते २० किलोवॅट : दरमहा प्रत्येकी ५८३ रुपये
  • किलोवॉट : प्रतिकिलोवॉट अँपवेयर ३८८ रुपये

उद्योजक (उच्चदाब उपगट)

  • प्रतिकिलोवॅट अँपिअर ५४९ रुपये

महागडी वीज खरेदीसाठी लागणारा खर्च भरून देण्याचे आदेश २०२० मध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणला दिले आहेत. जो ग्राहक जास्त वीज वापरेल, त्यांना अधिक समायोजन इंधन शुल्क भरावे लागेल. तर कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना कमी वीज शुल्क लागेल. जर एखादा ग्राहक १०० युनिट दरमहा वापरत असेल तर त्याला केवळ २० पैसे वाढ भरावी लागेल तर जो ग्राहक ५०० युनिटपर्यंत वीज वापरेल, त्याला ७० पैसे युनिटने इंधन समायोजन शुल्क भरावे लागेल. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना केवळ १० पैसे इंधन समायोजन शुल्क भरावे लागेल, असे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा – रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.