PM KISAN : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन शासन निर्णय !
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN) सुरु केली आहे. सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार आयुक्त (कृषि) यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षा च्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बैंक ऑफ इंडीया, पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत.
सद्यःस्थितीत, कृषि आयुक्तालयाने सदर योजनेंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकरीता जिल्हास्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे ३४ जिल्ह्यांसाठी ३४ स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त, कृषि यांचे स्तरावर सदर योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरुन खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन शासन निर्णय – PM KISAN :
१. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM KISAN) प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बैंक ऑफ इंडीया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे ३४ जिल्ह्यांसाठी ३४ स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. तसेच, सदर योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त (कृषि) यांचे स्तरावर आयुक्त (कृषि) यांच्या नावे सेंट्रल बैंक ऑफ इंडीया, पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अटी व शर्ती :
१. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM KISAN) जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रक्कमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा. सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे असतील.
२. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त (कृषि) यांचे नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रक्कमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा. सदर खात्यासाठी मेकर म्हणून कृषि आयुक्तालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून कृषि आयुक्तालयातील सहाय्यक संचालक (लेखा – १ ) हे असतील.
३. सदर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजूरीने मुदतवाढीकरिता खर्च करता येईल. ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही, अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कमा शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील.
४. सदर बँक खात्यांमध्ये जमा होणाऱ्या व्याजासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे कार्यवाही संबंधितांनी करावी.
५. सदर बँक खात्यातील व्यवहारांचे नियमितपणे ताळमेळ करणे तसेच लेखा परिक्षण करणे आवश्यक राहिल.
६. सदरचे बँक खाते बंद केल्यास, त्यामधील शिल्लक रक्कमेचा ताळमेळ घेऊन अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेखाशिर्षाखाली तात्काळ जमा करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
७. सदरहू बँक खात्यांचे संनियंत्रण, लेखापरिक्षण व ताळमेळ इ. बाबत वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश/सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, याबाबत आयुक्त (कृषि) यांच्याकडून दक्षता घेण्यात येईल.
८. प्रस्तुत योजना राबविताना केंद्र शासनाच्या निकषांची पूर्तता होईल याची आयुक्त (कृषि) यांच्याकडून खात्री करण्यात येईल.
प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौ. संदर्भ क्र.१६१/ का.१४३१, दि.०१.०३.२०२४ व वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र.११६/ २०२४/ व्यय-१, दि.१५.०३.२०२४ व अनौ. संदर्भ क्र.१३४३/ २०२४/ कोषा प्रशा-५, दि.३१.०३.२०२४ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM KISAN) बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – पीएम किसान योजनेचा हप्ता स्वेच्छेने बंद कसा करावा ? Voluntary surrender of PM Kisan Yojana benefits
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!