कृषी योजनाआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!

कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे. जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे हा उद्देश कृषी यांत्रिकीकरण योजनेचा आहे. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हे महाडीबीटी, कृषी विभागाचे मुख्य धोरण आहे.

महाडीबीटी पोर्टल कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजना:

अनुदान: या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

  1. ट्रॅक्टर
  2. पॉवर टिलर
  3. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  4. बैल चलित यंत्र/अवजारे
  5. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  6. प्रक्रिया संच
  7. काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  8. फलोत्पादन यंत्र/अवजारे
  9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  10. स्वयं चलित यंत्रे

भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:

>

१) कृषि अवजारे बँकेची स्थापना
२) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना

महाडीबीटी पोर्टल कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) लाभाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

पात्रता:

  1. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  2. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
  3. शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
  4. फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
  5. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
  6. एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड.
  2. ७/१२ उतारा.
  3. ८ अ दाखला.
  4. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.
  5. जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ).
  6. स्वयं घोषणापत्र.
  7. पूर्वसंमती पत्र.

महाडीबीटी पोर्टलवर कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज:

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

सूचना:-

  • कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा.
  • आपले नोंदणीकृत वापरकर्ता नाव प्रविष्ट करा.
  • आपला संकेतशब्द प्रविष्ट करा.
  • प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा.
  • लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा.
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला” बटणावर क्लिक करा.
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, “वापरकर्ता नाव विसरला” बटणावर क्लिक करा.

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

हेही वाचा – शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.