नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

MPSC Civil Services Bharti 2024 : MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ( MPSC Civil Services Bharti -२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अनुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरीता लागू आहेत.

प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा MPSC Civil Services Bharti परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक ०६ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र MPSC Civil Services Bharti २०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे :-

MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – MPSC Civil Services Bharti 2024:

जाहिरात क्र. : 414/2023

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

एकूण जागा : 524 जागा

पदाचे नाव आणि तपशील :

अ. क्र. विभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब48
3मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45
एकूण जागा524

शैक्षणिक पात्रता :

  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  2. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
  3. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

फी : खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024 (11:59 PM)

परीक्षेचे वेळापत्रक :

अ. क्र. परीक्षादिनांक
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202406 जुलै 2024
2राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024
4महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024

पूर्व परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 केंद्र.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for MPSC Civil Services Bharti) :

MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (MPSC Civil Services Bharti) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – Indian Navy Agniveer MR Bharti : भारतीय नौदलात अग्निवीर MR पदांची मेगा भरती 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.