महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायतीनी गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलवर खरेदी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना – Government e Marketplace (GeM)

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस हे भारतातील सार्वजनिक खरेदीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. सरकारी खरेदीदारांसाठी खुले आणि पारदर्शक खरेदी मंच तयार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2016 रोजी हा उपक्रम सुरू केला होता.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या Government e Marketplace (GEM) पोर्टलची कार्यपध्दती, राज्यशासनास वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

ज्याअर्थी Government e Marketplace (GEM) पोर्टलवर खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तु व सेवांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त पुरवठादार असतील तर सदरच्या वस्तु व सेवांची Government e Marketplace (GEM) पोर्टलवर खरेदी करण्यास खरेदी धोरण दिनांक ०१/१२/२००१६ मधील परिच्छेद क्र.२.४ मध्ये नमुद केलेल्या लक्ष्यांकित विभागांना/कार्यालयांना बंधन कारक करण्यात आले आहे.

ग्रामपंचयात स्तरावरील अ) रु. ५०,०००/- पेक्षा जास्त व (ब) रु. ३,००,०००/- वरील Government e Marketplace (GEM) पोर्टलवर खरेदीची कार्यपध्दती अवलंबिताना शासन निर्णयानुसार सदर प्रणालीचा वापर करण्यासाठी जबाबदार प्राधिकारी घोषीत करणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांनी या पोर्टलनुसार सर्व बाबीची पुर्तता करणे बंधनकारक आहे.

राज्य शासनाच्य सर्व खरेदीदार विभागांनी Government e Marketplace (GEM) पोर्टलवर खरेदी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयीन ई मेलसह सदर पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्या अनुषगांने ग्रामपंचायत स्तरावरील अ) रु. ५०,०००/- पेक्षा जास्त व रु. ३,००,०००/- पर्यंत व ब) रु.३,००,०००/- वरील Government e Marketplace (GEM) पोर्टलवर खरेदीची कार्यपध्दती अवलंबितांना शासन निर्णयानुसार खरेदीदार विभागाची या पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.

सदर प्रणालीचा वापर करण्यासाठी शासनाचे विभागाचे त्या – त्या स्तरावर जबाबदार प्रधिकारी म्हणजेच १ ) Primary User (प्राथमिक वापरकर्ता) व २ ) Secondary user (दुय्यम वापरकर्ता) buyer (खरेदीदार) Consgnee (माल स्विकृत करुन पोहोच देणारा) व P.A.O. (खरेदीची देयके प्रदान करणारा) या प्रमाणे जबाबदार प्राधिकारी शासनामार्फत/विभागामार्फत नियुक्त नसल्याने ग्रामपंचायतींना वस्तु व सेवांची Government e Marketplace (GEM) पोर्टलवरती नोंदणी करणे आवश्यक आहे.

उघोग व ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय क्र.भांखस -२०१४/प्र.क्र.८२/भाग iii/उघोग -४/दिनांक ०१/१२/२०१६ मधील परिच्छेद क्र.१३ व सुधारित नियम पुस्तीकेतील परिच्छेद क्र २.१३ मधील तरतुद विचारात घेऊन Government e Marketplace (GEM) पोर्टल वापर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जबाबदार प्राधिकारी घोषीत करण्याबाबत योग्य ते प्रशासकीय निर्णय घेण्यास परभणी जिल्हा परिषद सक्षम आहे असे सुचित केलेले आहे.

त्या अर्थी वरिल प्राप्त सुचनेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर वस्तु व सेवाची खरेदी Government e Marketplace (GEM) पोर्टलवरुन करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर या आदेशाने खालीलप्रमाणे वापरकर्ता निश्चीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

1प्राथमिक वापरकर्तागट विकास अधिकारी संबंधीत पंचायत समिती
2दुय्यम वापरकर्ता क्रमांक – १ खरेदीदार (Buyer)सरपंच सबंधीत ग्रामपंचायत
3दुय्यम वापरकर्ता क्रमांक -२ माल स्विकृतकरुन पोहच देणारा. (Consgnee)सरपंच सबंधीत ग्रामपंचायत
4प्रदानकर्ता/PAO/DDO खरेदीच्या देयकांचे प्रदान करणारा ग्रामसेवक/ग्रा.वि.अ.संबंधीत ग्रामपंचायत.

तसेच प्राथमिक वापरकर्ता म्हणजेच संबंधीत गटाचे, गट विकास अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त विकास गटातील सर्व ग्रामपंचायतीची नोंद Government e Marketplace (GEM) पोर्टलवर करणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात येत आहे. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून करण्यात यावी.

ग्रमापंचायत स्तरावर Government e Marketplace (GEM) या पोर्टलच्या वापर करणा-या वापरकर्त्यांना शासन निणर्यातील तरतुद तसेच या पोर्टलच्या वापरा बाबत केंद्र व राज्य शासनामार्फत करण्यात येणाऱ्या वेळोवेळीच्या सुधारणा बंधनकारक राहतील.

संपर्क:-

ई-मेल: helpdesk-gem@gov.in

टोल फ्री नंबर: 1800-419-3436 / 1800-102-3436

संकेतस्थळ: https://gem.gov.in

हेही वाचा – ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प व लेखे (ग्रामपंचायत बजेट) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ नुसार (Gram Panchayat Budget)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.