उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

उत्पन्नाचा दाखला आपल्याला शासकीय योजनेसाठी, शिक्षणासाठी किंवा इतर योजनेसाठी महत्वाचा असतो. उत्पन्न दाखला मिळण्यासाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास खूप कमी दिवसात उत्पन्न दाखला मिळू शकतो उत्पन्न दाखला ऑनलाईन कशाप्रकारे मिळवावा यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” खालील वेबसाईट ओपन करायची आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “महसूल विभाग” हा पर्याय निवडायचा आहे, तसेच उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडा.

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील मिळकतीचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामधील मिळकतीचे प्रमाणपत्र या ऑपशन वर क्लिक करा.

नंतर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हा ऑपशन येईल तर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे:

ओळखीचा पुरावा (किमान -1)

  • पारपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदाता ओळखपत्र
  • अर्जदाराचा फोटो
  • निमशासकीय ओळखपत्र
  • आर एस बी वाय कार्ड
  • म्रारोहयो जोब कार्ड
  • वाहन चालक अनुज्ञप्ती

पत्त्याचा पुरावा (किमान -1)

  • पारपत्र
  • वीज देयक
  • भाडे पावती
  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • दूरध्वनी देयक
  • पाणीपट्टी पावती
  • मालमत्ता कर पावती
  • मतदार यादीचा उतारा
  • वाहन चालक अनुज्ञप्ती
  • मालमत्ता नोंदणी उतारा
  • ७/१२ आणी ८ अ चा उतारा

इतर दस्तऐवज (किमान -1)

वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य / वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

वयाचा पुरावा (किमान -1)

  • जन्माचा दाखला
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
  • सेवा पुस्तिका (शासकीय / निम – शासकीय कर्मचारी)

उत्पन्नाचा पुरावा (किमान -1)

  • आयकर विवरण पत्र
  • सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल
  • वेतन मिळत असल्यास फॉर्म न १६
  • निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र
  • अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणी 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल
  • अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)
  • इतर

स्वघोषणापत्र

आवश्यक कागदपत्रे पहा आणि त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा, व नंतर उत्पन्न प्रमाणपत्र हे पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला एक फॉर्म आलेला असेल (Application Form) या फॉर्ममध्ये दाखवल्याप्रमाणे आपली माहिती भरा.

जर आपल्याला दाखला ३ वर्षासाठी हवा असेल तर Income Year मध्ये ३ वर्षासाठी किंवा १ वर्षाचा हवा असेल तर १ वर्षासाठी निवडा.

वैयक्तिक तपशिल: यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, राष्ट्रीयत्व, व्यवसाय तत्सम माहिती निवडा.

अर्जदाराच्या निवासाचा तपशिल: यामध्ये गाव, तालुका, जिल्ह्यासोबत या section मध्ये तुमचा पत्ता भरा. जर तुमच्याकडे PAN कार्ड असेल तर PAN Card चा नंबर भरा.

कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहीती: यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांची शैक्षेनिक माहिती भरा.

लाभार्थीचा तपशील: यामध्ये ज्याच्यासाठी दाखला काढायचा आहे त्याची माहिती आणि कशासाठी दाखला लागत आहे याचे कारण लिहा.

कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण: यामध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव, त्याच्या नावावर असलेली जमीन, जमिनीचा प्रकार, जिल्हा, तालुका, अन गाव जिथे ही जमीन आहे हे भरा.

विविध स्रोतांमार्फत कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील: यामध्ये विविध क्षेत्रातून मिळणाऱ्या तुमच्या उत्पन्नाचे विवरण इथे लिहा.

उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र: यामध्ये इथे तुम्ही जोडणार असणारे कागदपत्र निवडा. नंतर “मला मंजूर” वर टिक करा आणी समावेश करा वर क्लिक करा.

समावेश करा” वर क्लिक केल्यानंतर दाखल्यासाठी कागदपत्र अपलोड करणे हे पेज ओपन होईल, इथे तुम्हाला लागणारी कागदपत्रे जोडायची आहेत.

तुम्ही अपलोड करणारे कागदपत्रे हे 75 ते 500KB या साईज मध्ये हवे आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यापूर्वीच या https://picresize.com/ वर जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंटची साईज वाढवू किंवा कमी करू शकता.

200 ते 212 पिक्सेल उंची अन 160 पिक्सेल रुंदी याप्रमाणात तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. ज्यांच्याकडे अशा प्रमाणात फोटो आहे त्यांनी फोटो अपलोड करा.

बहुतांश लोकांकडे याप्रमाणात फोटो नसतो, ज्यांच्याकडे या प्रमाणात फोटो नाही किंवा ज्यांना माहितीच नाही आपल्या फोटोची साईज त्यांनी CLICK Here To Crop Photo यावर click करा. एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेज मध्ये आपल्याकडे असेलला फोटो अपलोड करा. तिथे तुमचा फोटो योग्य प्रमाणात crop होईल. हा Crop झालेला फोटो download करा. अन मग तो अपलोड करा.

त्यानंतर पैसे भरणे हा ऑपशन येईल. यासाठी तुम्ही कोणत्याही (Online Banking/ Credit Card/ Debit Card/ PayTm / ATM / BHIM App / UPI) पद्धतीने पैसे भरू शकता.

पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज तत्सम अधिकाऱ्याकडे जाईल. अर्ज केल्यापासून 15 दिवसात तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळेल.

हेही वाचा – जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!