जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

01 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी निर्गमित करण्याची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. या लेखात आपण जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घेणार आहोत.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php हि वेबसाईट ओपन करायची आहे.

आता नवीन युजर (New User Registration) वर क्लिक करा.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर

आता हिथे खालील चित्रामध्ये जशी महिती दिले आहे तशी भरा आणि रजिस्ट्रेशन करा.

मोबाईल नंबर टाकल्यावर ओटीपी येईल तो तिथे टाका आणि एक मेल आयडी वर मेल येईल तो व्हेरिफाय करा.

त्यानंतर युजर नेम म्हणजेच मेल आयडी आणि पासवर्ड मोबाईल नंबर वर मॅसेज येईल तो घेऊन लॉगिन करा.

आता Terms and Conditionsचे पेज येईल ते वाचून I agree वर क्लिक करून Proceed वर क्लिक करा

अर्जाचा प्रकार:(Type of Application):
शिक्षण(Education)
निवडणूक(Election)
सेवा( Service)
इतर( Other)

अर्जाचा प्रकार सिलेक्ट करून सबमिट बटन वर क्लिक करा.

नंतर Applicant Information विंडो ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची माहिती भरा.

सक्षम प्राधिकरणाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कागदपत्राचे नाव:

अर्जदार शाळा एलसी / टीसी
फादर स्कूल एलसी / टीसी
ग्रँड फादर स्कूल एलसी / टीसी
जुने 7/12
8 अ
स्वत: ची घोषणा
प्रतिज्ञापत्र
वडिलांचे जात प्रमाणपत्र
आजोबांचे जातीचे प्रमाणपत्र
बोनाफाईड प्रमाणपत्र
रेशन कार्ड
रक्ताच्या नात्यात जातीचे वैधता प्रमाणपत्र
कोतवाल पुस्तकाची प्रत
सेवा पुस्तकाची प्रत
अर्जदाराचा फोटो आयडी

अर्जदाराची सर्व माहिती भरून पत्ता, कुटूंबाची माहिती, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!