मंडणगड पॅटर्न शालेय स्तरावर मिळणार जात प्रमाणपत्र !
अकरावी, बारावीत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र महाविद्यालयातच देण्याची घोषणा समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली होती. जात वैधता प्रमाणपत्र वाटपाचा हा ‘मंडणगड पॅटर्न- Mandangad Pattern Caste Certificate’ राज्यभर राबविण्यात येणार आहे.
मंडणगड पॅटर्न शालेय स्तरावर मिळणार जात प्रमाणपत्र ! – Mandangad Pattern Caste Certificate:
अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. ते मिळविण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जात प्रमाणपत्र महाविद्यालय स्तरावरच देण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.
शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार शालेय प्रवेशासाठी तसेच पुढील विविध लाभांसाठी वेळोवेळी जात प्रमाणपत्राची मागासवर्गीय विद्यार्थी व नागरिकांस आवश्यकता भासते. तथापि, मागासवर्गीय पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी येतात. यासाठी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये ‘‘मंडणगड पॅटर्न’’ प्रमाणे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी, 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी, पालक विहित कालमर्यादेत समितीकडे अर्ज सादर न केल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत जात प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते.
पुढील लेख देखील वाचा!
- जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस – Caste Validity Certificate
- जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार! जात वैधता ऑफलाइन अर्ज PDF फाईल.
- जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!