‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’; राज्य सरकारची विशेष मोहीम !
सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने सन २०१५ मध्ये “आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तथापि, सदर पोर्टलचा आढावा घेतला असता मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे अवलोकन केले असता अनेक प्रकरणी संबंधित नागरिकांचे अर्ज/तक्रारी याचा सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित कालमर्यादिमध्ये निपटारा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ/अर्ज/तक्रारी यांचा निपटारा करणेकरिता दि. १७ सप्टेंबर, २०२२ दि. २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सेवा पंधरवडा ” राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे.
सेवा पंधरवडयात खालीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि.१० सप्टेंबर २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरूपात निपटारा करणे अपेक्षित आहे.
- आपले सरकार वेबपोर्टल ३९२ सेवा.
- महावितरण पोर्टल २४ सेवा.
- डी.बी. टी. पोर्टल ४६ सेवा.
- नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणा-या शासकीय सेवा.
- विभागाच्या स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज.
- याव्यतिरिक्त सोबत जोडलेल्या पत्रातील १४ सेवा.
सेवा पंधरवडयामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागीकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी.
अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी. सर्व संबंधित विभागांच्या जिल्हाप्रमुखांनी सेवा पंधरवडयाचे यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करावे यातील प्रगतीविषयी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा आणि क्षेत्रीय भेटी देण्यात याव्यात. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडयाविषयी जनतेमध्ये योग्य माहिती प्रसारीत करण्यात यावी. सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी आयोजित शिबिरे, त्यामधील नागरिक प्रशासनाचा सहभाग या विषयी स्थानिक प्रसारमाध्यमांमधून प्रसिध्दी देण्यात यावी.
सेवा पंधरवडा समाप्तीनंतर दि. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व सक्षम प्राधिकारी यांचेकडून दि. १० सप्टेंबर २०२२ अखेर प्रलंबित संदर्भापैकी निपटारा करण्यात आलेले संदर्भ निपटारा न झालेल्या संपर्क विषयी स्वयंस्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र घेण्यात यावे. प्रत्येक शासकीय विभागाने सेवा पंधरवडा कालावधीत केलेल्या कामकाजाविषयी या प्रमाणपत्रासह जिल्हानिहाय प्रगती अहवाल सोबतच्या प्रपत्रामध्ये (दि. १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत शासनास सादर करावा.
राज्य शासनाच्या विविध विभागातील कार्यरत असणारे विविध पोर्टलवर माहिती वेळोवेळी अद्ययावत करणेची दक्षता घ्यावी, ” कृ.मा.प. उपरोक्त सेवा घराचे आयोजन करतांना ज्या भागात निवडणूक आचारसंहिता लागू असेल आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!