वृत्त विशेष

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना ; लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाने 6 एप्रिल 2022 च्या आदेशानुसार बिडी कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ केली आहे. या आदेशामुळे याचा फायदा देशभरातील सुमारे 80 लाख बिडी कामगारांना होणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे.

भारतीय मजदूर संघाने 1999 साली बिडी कामगारांची आर्थिक परिस्थिती हालाखीचे व गरीबची असल्याने त्यांची मुले चांगले मार्क मिळवून ही शिष्यवृत्ती लाभ मिळू शकत नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिले यावेळी भारतीय मजदूर संघाने शैक्षणीक आर्थिक मदत शब्द प्रचलित केला व पास झालेल्या सर्व मुलांना आर्थिक मदत मिळू लागली या वेळी आर्थिक शैक्षणिक मदतीची दर ठरविण्यात आले होते. या नंतर रोजगाराची अस्थिर परिस्थिती, वाढलेली महागाई पहाता शैक्षणिक मदतीत वाढ करण्यात यावी. या बाबतीत तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार व केंद्रीय कामगार मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या समावेत चर्चा करून सततच्या पाठपुरावा केला.

केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणासाठी रु. 250/- वरून रु.1000/- प्रति वर्ष, माध्यमिक शिक्षणासाठी रु. 500/- रु. 2000/- प्रति वर्ष व पदवी करिता रु. 3000/- वरून रु.6000/- प्रति वर्ष व व्यावसायिक पदवी करिता रु.15,000/- वरून रु. 25,000/- पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.

हेही वाचा – MahaJyoti Free TAB 2025-26 : महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.