डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना (Krishi Swavalamban Yojana) ही अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना – Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana
अनुदान:
या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
पात्रता:
- लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
1) नवीन विहीर या बाबीकरीता आवश्यक कागदपत्रे-
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
2) 7/12 व 8-अ चा उतारा
3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (रु. 1,50,000/- पर्यंत).
4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
6) तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्या जागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
11) ग्रामसभेचा ठराव.
2) जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता आवश्यक कागदपत्रे-
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (रु. 1,50,000/- पर्यंत).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु.च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्या विहिरीचे काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
3) शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचन संच या बाबीकरीता आवश्यक कागदपत्रे-
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (रु. 1,50,000/- पर्यंत ).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
5) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
6) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
7) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
8) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसल्याबाबत हमीपत्र
9) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
ऑनलाईन अर्ज (Apply Online):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करु शकता.
https://mahadbt.maharashtra.gov.in/
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!