केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेट ! शेतकऱ्यांना या 7 योजनांसाठी 14,235 कोटींच्या खर्चास मंजुरी !
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Shetkaryansathi Yojana) मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठ्या घोषणा केल्या आहेत. या 7 मोठ्या निर्णयांवर सरकार १४,२३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर डिजिटल कृषी मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 2817 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि राहणीमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने काही योजनांची आज घोषणा केली आहे. त्यात डिजिटल कृषी मिशन आणि पीक विज्ञान योजनांचाही समावेश आहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी सात प्रमुख योजना – Shetkaryansathi Yojana:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने (Shetkaryansathi Yojana) आज शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली.
1. डिजिटल कृषी अभियान:
डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित, डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल. या अभियानाचा एकूण खर्च 2.817 कोटी रुपये आहे. यात दोन आधारभूत स्तंभ आहेत
- ऍग्री स्टॅक
- शेतकरी नोंदणी कार्यालय
- गाव भू-अभिलेख नोंदणी कार्यालय
- पीक पेरणी नोंदणी कार्यालय
- कृषी निर्णय समर्थन प्रणाली
- भौगोलिक डेटा
- दुष्काळ/पूर निरीक्षण
- हवामान/उपग्रह डेटा
- भूजल/जल उपलब्धता डेटा
- पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानीकरण
अभियानात खालील गोष्टींची तरतूद आहे:
- माती प्रोफाइल
- डिजिटल पीक अंदाज
- डिजिटल उत्पन्न प्रतिमानीकरण
- पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था
- एआय आणि बिग डेटा सारखे आधुनिक तंत्रज्ञान
- खरेदीदारांशी संपर्क व्यवस्था
- मोबाईल फोनवरून अद्ययावत माहिती
2. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान:
एकूण 3,979 कोटी रुपये खर्च. हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल. त्याचे सहा स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत.
- संशोधन आणि शिक्षण
- वनस्पती अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन
- अन्न आणि चारा पिकासाठी अनुवांशिक सुधारणा
- कडधान्य आणि तेलबिया पीकातील सुधारणा
- व्यावसायिक पीकातील सुधारणा
- कीटक, सूक्ष्मजंतू, परागकण इत्यादींवर संशोधन.
3. कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण:
एकूण 2,291 कोटी रुपये खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना सध्याच्या आव्हानांसाठी तयार करेल आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे.
- भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत
- कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण
- नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने
- अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर … डिजिटल डीपीआय, एआय, बिग डेटा, रिमोट इ
- नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेचा समावेश
4. शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन:
एकूण 1,702 कोटी रुपये खर्चासह, पशुधन आणि दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे
- पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण
- दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास
- पशु अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन, उत्पादन आणि सुधारणा
- प्राण्यांचे पोषण आणि लहान रवंथ निर्मिती आणि विकास
5. फलोत्पादनाचा शाश्वत विकास:
1129.30 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह या उपाययोजनेचे उद्दिष्ट बागायती पिकांमधुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे
- उष्णकटिबंधीय, उप-उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण बागायती पिके
- मूळ, कंद, कंदाकृती आणि शुष्क पिके
- भाजीपाला, फुलशेती आणि मशरूम पिके
- वृक्षारोपण, मसाले, औषधी आणि सुगंधी वनस्पती
6. कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण:
1,202 कोटी रुपयांच्या खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण.
7. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन:
1,115 कोटी रुपयांच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन.
हेही वाचा – मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!