आपले सरकार - महा-ऑनलाईननगरपंचायतनगरपरिषदनिवडणूकपोटनिवडणूकमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026: ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया | संपूर्ण माहिती!

लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे अचूक आणि अद्ययावत मतदार यादी. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि अपात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत राहू नयेत, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (Special Intensive Revision – SIR 2026) ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करतील. नागरिकांनी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे देऊन या प्रक्रियेत सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यात मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही.

या लेखात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (SIR 2026) म्हणजे काय, BLO घरभेट कशी होईल, अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतील, ECINet App चा उपयोग काय आहे आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 – SIR 2026:

Special Intensive Revision (SIR) म्हणजे मतदार यादीतील प्रत्येक मतदाराच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्याची प्रक्रिया होय.

या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –

  • पात्र नागरिकांची नावे कायम ठेवणे
  • नव्याने पात्र झालेल्या मतदारांची नोंदणी करणे
  • मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे योग्य प्रकारे अद्ययावत करणे
  • डुप्लिकेट नावे दूर करणे
  • मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनवणे

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR 2026) ऑनलाईन फॉर्म करण्यासाठी मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ECINet App किंवा voters.eci.gov.in वर भेट द्या.

वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म‘ मध्ये जाऊन ‘SIR Fill Enumeration Form‘ निवडा. नवीन युजर असाल तर आधी नोंदणी करा.

Fill Enumeration Form
Fill Enumeration Form

आता (स्वतःचे नाव, पालकांचे नाव, किंवा घरातील इतर कुणाचे नाव २००२/२०२५-२६ च्या यादीत असणे) चारपैकी एक पर्याय निवडा.

तुमचा निवडलेला पर्याय, जन्मतारीख, आधार क्रमांक, पालकांची माहिती आणि मतदान कार्डचा क्रमांक अचूक भरा

पुढे तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर आधार नंबरद्वारे ओटीपी व्हेरिफिकेशन करा. फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला एक ‘रेफरन्स आयडी’ मिळेल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या संबंधित बीएलओ (BLO) ला कळवा.

सूचना: ऑनलाईन फॉर्म करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक घरबसल्या ऑनलाइन अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

BLO घरभेट

BLO नागरिकांच्या घरी भेट देतील, या भेटीदरम्यान ते –

  • गणना अर्ज देतील
  • माहिती भरून घेतील
  • आवश्यक कागदपत्रांची माहिती देतील
  • भरलेला अर्ज स्वीकारतील
  • अर्जाची पोच देतील

BLO घरी आल्यावर काय करावे?

BLO घरी आल्यानंतर नागरिकांनी पुढील गोष्टी कराव्यात.

  • शांतपणे माहिती तपासून घ्या.
  • अर्जातील सर्व माहिती अचूक भरा.
  • स्वाक्षरी करा.
  • आवश्यक असल्यास कागदपत्रे दाखवा.
  • अर्जाची एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
  • BLO कडून पोच घ्या.

घरभेटीपूर्वी कोणती तयारी करावी?

घरभेटीपूर्वी पुढील माहिती तयार ठेवावी.

  • मतदाराचे नाव
  • मतदारसंघ
  • मतदान केंद्र
  • भाग क्रमांक
  • अनुक्रमांक

ही माहिती ECINet App किंवा voters.eci.gov.in वरून पाहता येते.

कोणती कागदपत्रे लागू शकतात?

जर मागील SIR मध्ये तुमचे किंवा तुमच्या आई-वडिलांचे नाव उपलब्ध नसेल, तर खालीलपैकी कोणतेही एक किंवा अधिक कागदपत्र आवश्यक ठरू शकतात.

  • जन्म दाखला
  • पासपोर्ट
  • दहावीचे प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • सरकारी कर्मचारी ओळखपत्र
  • निवृत्तीवेतन ओळखपत्र
  • स्थानिक स्वराज्य संस्थेची कुटुंब नोंद
  • शासनाने दिलेले घर किंवा जमीन वाटप प्रमाणपत्र
  • वनहक्क प्रमाणपत्र
  • राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा
  • १ जुलै १९८७ पूर्वी शासनाने दिलेले ओळखपत्र
  • बँक, टपाल किंवा LIC संबंधित जुने ओळखपत्र

अधिकृत माहितीनुसार आधार कार्ड हे ओळख पडताळणीसाठी स्वीकारले जाऊ शकते, मात्र आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रेही मागवली जाऊ शकतात.

ECINet App कसा उपयोगी पडतो?

ECINet App मध्ये तुम्ही –

  • मतदार यादीतील नाव शोधू शकता.
  • मतदान केंद्र तपासू शकता.
  • जुनी SIR माहिती पाहू शकता.
  • BLO शी संपर्क साधू शकता.
  • अर्ज प्रक्रियेबाबत माहिती मिळवू शकता.

मतदारांनी कोणती काळजी घ्यावी?

  • चुकीची माहिती देऊ नका.
  • बनावट कागदपत्रे वापरू नका.
  • अर्जाची प्रत जपून ठेवा.
  • मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवा.
  • BLO च्या भेटीवेळी घरी उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करा.

या मोहिमेचे फायदे

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (SIR 2026) मुळे –

  • मतदार यादी अधिक अचूक होईल.
  • मतदानाचा अधिकार सुरक्षित राहील.
  • बनावट नावे कमी होतील.
  • नवीन मतदारांची योग्य नोंदणी होईल.
  • निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल.

मतदारांनी सहकार्य का करावे?

निवडणूक आयोगाची ही मोहीम नागरिकांच्या हितासाठी आहे. BLO घरी आल्यानंतर आवश्यक माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वेळेत अर्ज भरल्यास भविष्यात मतदान करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

  • माहिती तपासणी: ECINet App किंवा voters.eci.gov.in , https://www.eci.gov.in/
  • मतदार मदत क्रमांक: 1950

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (SIR 2026) ही केवळ कागदपत्रांची प्रक्रिया नसून देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाची मोहीम आहे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव योग्यरित्या मतदार यादीत राहावे आणि कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

त्यामुळे BLO घरी आल्यावर आवश्यक सहकार्य करा, अर्ज काळजीपूर्वक भरा आणि अधिकृत माहितीनुसारच प्रक्रिया पूर्ण करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ – SIR 2026)

1. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (SIR 2026) म्हणजे काय?

मतदार यादीतील माहितीची सखोल पडताळणी करून ती अद्ययावत करण्याची निवडणूक आयोगाची विशेष मोहीम आहे.

2. BLO घरभेट कधी होईल?

30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत. (सुधारीत वेळापत्रक नुसार बदलू शकते)

3. अर्ज कुठे जमा करायचा?

भरलेला अर्ज संबंधित BLO कडे जमा करायचा.

4. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (SIR 2026) साठी कोणती कागदपत्रे लागू शकतात?

जन्म दाखला, दहावीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, सरकारी ओळखपत्र इत्यादी.

5. ECINet App चा उपयोग काय?

मतदार यादी तपासणे, नाव शोधणे, BLO माहिती मिळवणे आणि मतदार संबंधित सेवा वापरणे.

6. पोच घेणे आवश्यक आहे का?

होय. अर्ज जमा केल्यानंतर BLO कडून पोच घेऊन ती सुरक्षित ठेवावी.

7. मदतीसाठी कुठे संपर्क करावा?

मतदार मदत क्रमांक 1950 वर संपर्क साधता येईल.

या लेखात, आम्ही मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 (SIR 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख वाचा !

  1. मतदार पडताळणी 2026 बाबत पडणारे प्रश्न आणि उत्तरे | संपूर्ण माहिती!
  2. मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक घरबसल्या ऑनलाइन अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया!
  3. घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
  4. डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
  5. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार यादी 2026 – ऑनलाईन पाहा तुमचं नाव!
  6. विधानसभा मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  7. निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
  8. मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
  9. जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर
  10. पासपोर्टसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  11. रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
  12. जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.