सरकारी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

जिल्हा परिषद बुलढाणा सेस फंड योजना : सेसफंडातून मोटारपंप, आणि शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरु.

जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागामार्फत सन 2022-23 या वर्षातील जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेसफंड योजनेमधून मागासवर्गीय शेतकरी आणि मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर विद्युत 5 एचपी मोटार पंप आणि मागासवर्गीय महिलांना‍ शिलाई मशिन पुरविण्यात येणार आहे. यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद बुलढाणा सेस फंड योजना:

सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर कार्यालयात उपलब्ध आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी आणि महिला लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सर्व कागदपत्रांसह संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत.

या योजनेचा लाभ मागासवर्गीय शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त विधवा महिलांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

>

अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे:

१. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. २७/ अर्थबळ दि.०८ जून २०२२ नुसार लाभार्थी यांचे आधार कार्ड हे बँक अकाऊंट सोबत सलग्न असल्याची खात्री आपल्या स्तरावर करण्यात यावी व जे लाभार्थी यांचे आधार व बँक अकाऊंट सलग्न नसतील तर त्यांचे अर्ज समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, बुलडाणा येथे सादर करण्यात येऊ नये.

२. लाभार्थी मागासवर्गीय असल्याबाबतचा तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र. ३. वार्षिक उत्पन्न रू.५०,०००/- चे आत असल्याबाबत तहसिलदार दाखला/ दारिद्रय रेषेचे कार्ड.

४. ५ एच.पी. विद्युत मोटार पंपाकरीता जलसिंचनाची सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

५. ७/१२८ अ नमुना जोडावा.

६. लाभार्थीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे किंवा ६० वर्षापेक्षा कमी असावे या बाबतचे सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला/टि.सी./आधार कार्ड ची छायांकित प्रत.

७. महाराष्ट्र शासन सार्वजकि आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक लोसंधी-२०००/प्र.क्र.५७ / कुक-१ दिनांक ०९ मे २००० नुसार दिनांक १/५/२००१ पासून वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना फक्त छोटे कुटुंब (२ जीवंत अपत्य) संकल्पना अवलंबिणा-या जोडप्यांना लाभाकरीता पात्र समजण्यात येईल. फक्त छोटे कुटुंब (२ जीवंत अपत्य) असल्याबाबतचा पुरावा सोबत जोडावा.

८. आधार कार्ड छायांकित प्रत. सेल्फ अटेस्टेड करून सलग्न करावे.

९. बँक पासबुकची झेरॉक्स प्रत . १०. रहिवासी दाखला.

११. जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत मागील तिन वर्षात (सन२०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२) या वर्षात अंतर्गत लाभ घेतलेला लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा यांची खात्री मास्टर नोंदवहीवरुन करुनच अर्ज पंचायत समिती यांनी समाज कल्याण विभागास सादर करण्यात यावे.

१२. वरील प्रमाणे सर्व अटी ची पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये अन्यथा स्थानिक निधी लेखा परिक्षा बुलडाणा यांच्याकडुन होणाऱ्या लेखा परिक्षणामध्ये काही आक्षेप आल्यास किंवा वसुली निघाल्यास संबंधीत पंचायत समिती यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. व वसुली करण्यात येईल.

टिप: सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.

जिल्हा परिषद बुलढाणा सेस फंड योजना अर्ज नमुना: जिल्हा परिषद बुलढाणा सेस फंड योजना अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.