आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये बदल करा फक्त ५० रुपयात, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आपण या लेखामध्ये आपल्या आधार कार्ड ची दुरुस्ती कशी करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आताच्या काळामध्ये आधार कार्ड आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे, कारण कोणतेही शासकीय किंवा सरकारी योजना असेल त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.पण कधीकधी आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास आपल्याला आधार सेंटर ला जावे लागते यामध्ये आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जातो, पण आता आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास उदारणार्थ नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख इत्यादी मध्ये काही बदल करायचे असल्यास तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये बदल करू शकता. यासाठी तुम्हाला ५० रुपये चार्जेस आकारले जातील. पण हे बदल करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस:

आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून UIDAIची वेबसाईट ओपन करा करा.

https://ssup.uidai.gov.in/ssup/

या लिंक वरती गेल्यावर Aadhaar Self Service हे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Proceed to Update Aadhaar या ऑप्शन वर क्लिक करा. 

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

Proceed to Update Aadhaar  या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबरकॅप्चा कोड टाका व Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाइल नंबर वर जो OTP नंबर येईल तो टाकून लॉगिन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

लॉगिन केल्यानंतर Update Demographics Data या वरती क्लिक करायचे आहे.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

Update Demographics Data वर क्लिक केल्यावर आपण नाव, पत्ता, जन्म तारीख व लिंग यामध्ये बदल करू शकतो. यावरील प्रत्येक ऑप्शन वरती क्लिक केल्यावर आपण किती वेळा माहिती मध्ये बदल करू शकतो हे समजेल. 

नाव, पत्ता, जन्म तारीख व लिंग ऑप्शन वरती क्लिक करा आणि खाली Proceed वर क्लिक करा. 

समजा मला हिथे पत्ता बदलायचा आहे तर मी Address या ऑप्शन वर क्लिक करून Proceed वर क्लिक करणार आहे. 

सूचना:- सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवरून भाषा, मोबाइल नंबर आणि ईमेल अद्यतन तात्पुरते अक्षम केले गेले आहे. कृपया या अद्ययावत वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी केंद्रास भेट द्या.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
त्यानंतर काही सूचना येतील त्या वाचून "Yes, I am aware of this" वर टिक करून Proceed वर क्लिक करायचे आहे. 

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

मला पत्ता बदलायचा आहे म्हणून मी वरती Address हा ऑप्शन निवडला होता. त्यामुळे मी हिथे सध्याचा नवीन पत्ता टाकणार आहे, यामध्ये आपला पिनकोड, गावाचे नाव ,पोस्ट ऑफिस, जिल्हा व राज्य निवडायचे आहे.

Documnet Select वर क्लिक करून Upload Document वर क्लिक करायचे आहे. Address प्रूप साठी मी हिथे रेशन कार्ड अपलोड करणार आहे. 

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Priview वरती क्लिक करायचे आहे. यामध्ये आपल्याला पुन्हा काही बदल करायचे असल्यास करू शकता व पुन्हा एक कॅप्चा कोड टाकून Send OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. रजिस्टर मोबाइल नंबर वरती OTP नंबर येईल तो टाका. 

नंतर  "I hereby confirm that, I have read the instructions carefully and the information provided by me to UIDAI is true and correct." या ऑप्शन वर टिक करा आणि त्यानंतर Make Payment या ऑप्शन वरती क्लिक करा.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

Make Payment या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ५० रुपये एवढे पेमेंट येथे करायचे आहे. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंच्या  माध्यमाद्वारे पेमेंट करू शकता.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

पेमेंट केल्यावर तुम्ही (Acknowledgement Slip) पोचपावती Download बटन वर क्लिक करून डाउनलोड करून ठेवा. 

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आता तुम्ही (Acknowledgement Slip) पोचपावती  पाहू शकता.

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आधार अपडेट स्टेट्स चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर आणि Acknowledgement Slip मध्ये जो "URN(Update Request Number)" नंबर आहे तो टाकून Captcha टाका आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर OTP येईल तो टाकून Check Status वर क्लिक करा. 

https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus

आता घरबसल्या आधार कार्ड मध्ये ५० रुपयात बदल करा, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस

आधार कार्ड मध्ये बदल झाल्यावर तुम्हाला हिथे प्रोसेस स्टेट्स दाखवेल किंवा रजिस्टर मोबाईलवर एसएमएस द्वारे सूचना मिळेल.

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

0 Comments