मागील लेखामध्ये आपण गाव नमुना ९, गाव नमुना ९-ब विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आपण या लेखामध्ये गाव नमुना ९-अ (किर्द व जमापुस्तक) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गाव नमुना ९-अ म्हणजे जमीन महसूलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसुलीसाठीचे जमापुस्तक.
गाव नमुना ९-अ (किर्द व जमापुस्तक):
जमीन महसूल आणि स्थानिक उपकर म्हणजेच एकत्रीकृत जमीन महसुल म्हणून वसूल केलेल्या रकमेच्या पावत्या गाव नमुना नऊच्या नमुन्यात देण्यात येतात. मागणी नोंदवहीमध्ये दर्शविलेल्या इतर येणे रकमा आणि जमीन महसूलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसुलीच्या पावत्या गाव नमुना नऊ-अ नमुन्यात देण्यात येतात.
- उपरोक्त पावत्या देताना गाव नमुना नऊ चा विहित केलेला नमुनाच वापरावा.
- गाव नमुना नऊच्या पावत्या, कार्बन प्रतीसह दोन प्रतीत तयार कराव्या.
- पावती देतांना, पावतीच्या स्थळप्रतीवर मागच्या बाजूला, पावती दिल्याचे प्रतीक म्हणून, पैसे देणाऱ्याची सही घ्यावी.
- दिवसाच्या अखेरीस, त्या दिवसात दिलेल्या शेवटच्या स्थळप्रतीच्या मागच्या बाजूला हातात असलेली शिल्लक रक्कम लिहून ठेवावी.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
0 Comments