(MSSC) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना – Mahila Samman Savings Certificates
वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या स्मरणार्थ या योजनेची घोषणा केली होती. मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसह आणि दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह तसेच आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायांसह तिमाही चक्रवाढ पद्धतीने 7.5 टक्के दराने आकर्षक आणि निश्चित व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.
राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) योजना, 2019 मध्ये राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा चार लाख पन्नास हजार रुपयांवरून नऊ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे आणि 1 एप्रिल 2023 पासून संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2019 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि गुंतवणूकीची कमाल मर्यादा आजपासून 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
बचत ठेव आणि पीपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निधी (PPF) वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून सुधारणा करण्यात आली आहे. या उपायांमुळे टपाल खात्यामधल्या लहान बचत करणाऱ्या ग्राहकांना खूप फायदा होईल आणि टपाल कार्यालयाद्वारे या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करता येईल, विशेषतः ग्रामीण भागात आणि मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटक यांना लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.
(MSSC) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना – Mahila Samman Savings Certificates:
१ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली होती ती महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे. या योजनेवर ७.५% दराने व्याज मिळते.
महिला सन्मान बचत पत्र म्हणजे MSSC योजना २०२५ पर्यंत किंवा २ वर्षांसाठी असून या बचत योजनेत ७.५ टक्के व्याज दिला जाईल. महिला किंवा तुमच्या मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.
नफा किती होईल?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा २ लाख रुपये आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला ७.५% निश्चित व्याज दराने परतावा म्हणजे या योजनेत तुम्हाला एका वर्षात १५,४२७ रुपयांचा परतावा मिळेल. तर दोन वर्षांत ३२,०४४ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, या योजनेतील तुमची दोन लाख रुपयांची गुंतवणूक दोन वर्षांत २.३२ लाख रुपये होईल.
तुम्ही या योजनेत गुंतवलेली आंशिक रक्कम काढू (विथड्रॉ) शकता. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत भौतिक MSCC पावती मिळवण्यासाठी तुम्हाला ४० रुपये तर तुम्ही ऑनलाइन पावती घेतली तर तुम्हाला ९ रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, १०० रुपये टर्नओव्हर पेमेंटसाठी ६.५ पैसे आकारले जातील.
अधिक माहितीसाठी कृपया www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.
हेही वाचा – सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!