वृत्त विशेषसरकारी कामे

भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस !

आपण या लेखामध्ये भविष्य निर्वाह निधी (PF – Provident Fund) ऑनलाईन कसा काढावा? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पीएफ कसा काढायचा हे बहुतेक लोकांना माहित नसते, त्यामुळे ते पीएफ ऑफिसला जाऊन आपला पीएफ काढत असतात किंवा एखाद्या एजन्ट किंवा टॅक्स कंसल्टंट/CA कडे जाऊन त्यांचा सल्ला घेतात, त्याप्रमाणे ते त्यांचे कमिशन पण घेतात.

भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची ऑनलाईन प्रोसेस – (PF-Provident Fund:

PF काढण्याची प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे. तुम्ही स्वतः घरबसल्या मोबाईल अथवा लॅपटॉपच्या साहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकता.

UAN लॉगीन करणे:

सर्वात प्रथम खालील लिंक वरती क्लिक करून १२ अंकी UAN नंबर, पासवर्ड आणि (Captcha) कॅप्चा कोड टाकून लॉगीन करा. लॉगिन झाल्यावर काही Alert विंडो ओपन झाली तर ती बंद करा.

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface

log in
log in

सूचना:- जर तुमच्याकडे UAN नंबर नसेल तर तुमच्या (HR डिपार्टमेंट) ऑफिस मधून तो घ्या किंवा तुमच्या सॅलरी स्लिप मध्ये १२ अंकी UAN नंबर असतो, तो UAN नंबर तुम्ही पीएफ वेबसाइट वरून ACTIVATE करून घ्या.

KYC अपडेट करणे:

पीएफ काढण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची KYC पूर्ण अपडेटेड असणे गरजेचे आहे. या मध्ये आपले आधार, पॅन, बँक खाते हे सर्व ग्राह्य असले पाहिजे. नसेल तर आपण “Manage” या पर्याय मध्ये जाऊन KYC मध्ये लगेच सर्व माहित भरून अर्ज करू शकता. अर्जानंतर ते मंजूर झाले अथवा नाही हे त्याच पेज वरती पाहता येईल. तुम्ही काम करत असलेली संस्था आणि PF कार्यालय यांच्या कडून हे मंजूर/ना मंजूर केले जाते.

पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी KYC मधील माहितीची पूर्तता केल्यानंतर तुम्ही थेट अर्ज करू शकता. “Online Services” या पर्याय मध्ये Claim (Form-31, 19 & 10C) या पर्यायावर क्लिक करा.

Claim’ स्क्रीन सदस्याचे तपशील, केवायसी तपशील आणि अन्य सेवा तपशील प्रदर्शित करेल. आपल्या बँक खात्यातील शेवटचे चार अंक प्रविष्ट करा आणि ‘Verify’ वर क्लिक करा.

उपक्रमाच्या प्रमाणपत्रात सही करण्यासाठी ‘Yes’ वर क्लिक करा आणि नंतर पुढे जा.

आता, ‘Proceed for Online claim‘ वर क्लिक करा.

क्लेम फॉर्ममध्ये आपल्याला आवश्यक असलेला दावा निवडा, म्हणजेच ‘ईपीएफ सेटलमेंट, ईपीएफ भाग काढणे (कर्ज / आगाऊ) किंवा पेन्शन पैसे काढणे,’ मला अर्ज करायचा आहे ’या टॅबखाली निवडा. सेवेच्या निकषांमुळे जर पीएफ पैसे काढणे किंवा पेन्शन पैसे काढणे यासारख्या कोणत्याही सेवेसाठी सदस्य पात्र नसेल तर ड्रॉप-डाऊन मेनूमध्ये तो पर्याय दर्शविला जाणार नाही.

अगदी शेवटच्या पर्यायामध्ये आपल्याला “PF Advance” हा पर्याय निवडायचा आहे. यापुढे पीएफ काढण्याचे कारण निवडा (कोणतेही कारण निवडू शकता). शक्यतो Covid-19 हे कारण सध्याच्या स्थितीमध्ये जास्त योग्य राहील. या नंतर जितकी रक्कम काढणार आहेत ती टाकावी. आपला पत्ता, पासबुक चे पहिले पानं किंवा एक क्रॉस चेक अपलोड करावे.

आधार OTP वरती क्लिक करून आलेला OTP टाकून “Validate OTP and Submit claim form“वर क्लिक करा.

पीएफ कधी जमा होतो?

पीएफ जमा होण्यासाठी जवळपास दोन ते तीन आठवड्यांमध्ये आपल्या बँक खात्यावर PF जमा झाल्याचा मेसेज येईल. तसेच पासबुक देखील अपडेट केले जाईल. पीएफ जमा होण्यास विलंब लागत असेल तर आपण epfo च्या विभागीय कार्यालयात फोन करू शकता अथवा आपल्या एम्प्लॉयरकडे संपर्क करू शकता.

हेही वाचा – आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.