तलाठी कार्यालय नोंदवह्या

गाव नमुना ९-ब (पावती पुस्तके संग्रहाची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 9B

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना ९, आणि गाव नमुना ९-अ विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आपण या लेखामध्ये गाव नमुना ९-ब (गाव नमुना नऊची पावती पुस्तके व इतर पावती पुस्तके यांच्या संग्रहाची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना ९-ब (पावती पुस्तके संग्रहाची नोंदवही) – Gav Namuna 9B:

तलाठ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पावती पुस्तकांवर योग्य नियंत्रण ठेवणे हे या गाव नमुन्यामागचे कारण आहे.

  • तलाठी यांनी त्यांना देण्यात येणाऱ्या सर्व पावती पुस्तकांची नोंद गाव नमुना नऊ-ब मध्ये न चुकता करावी.
  • सर्व निरीक्षकांना गाव नमुना नऊ-ब निरीक्षणासाठी उपलब्ध करून द्यावा.
  • पावती पुस्तकांचा नवीन साठा आल्यास किंवा संपलेली पावतीपुस्तके तहसिल कार्यालयाच्या अभिलेख कक्षात जमा करताना प्रथम गाव नमुना नऊ-ब अद्ययावत करावा.
  • संपलेली पावती पुस्तके तहसिल कार्यालयाच्या अभिलेख कक्षात जमा केल्यावर अभिलेखापालाची सही न चुकता घ्यावी.
  • पावत्या वापरून संपलेली पुस्तके तात्काळ तहसिल कार्यालयाच्या अभिलेख कक्षात जमा करावीत. पावत्या वापरून संपलेली पुस्तके दोन वर्षापेक्षा अधिक काळ तलाठ्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेऊ नये.

गाव नमुना नऊ-ब मध्ये नोंद कशी करावी?

गाव नमुना नऊ-ब मध्ये तालुक्याकडून मिळालेली पावती पुस्तके आणि तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके असे दोन भाग आणि एकूण दहा स्तंभ आहेत.

तालुक्याकडून मिळालेली पावती पुस्तके या भागाखाली स्तंभ १ ते ४ येतात.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याकडून मिळालेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ १ मध्ये तालुक्याकडून ज्या दिनांकास पावती पुस्तके मिळतील तो दिनांक लिहावा.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याकडून मिळालेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ २ मध्ये तालुक्याकडून मिळालेल्या पावती पुस्तकाचा अनुक्रमांक लिहावा.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याकडून मिळालेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ३ मध्ये तालुक्याकडून मिळालेल्या पावती पुस्तके कोणत्या महसुलाच्या वसुलीसाठी आहेत ते नमूद करावे.
गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याकडून मिळालेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ४ मध्ये तालुक्याकडून मिळालेल्या प्रत्येक पावती पुस्तकातील पावतीचा क्रमांक कोणत्या क्रमांकापासून कोणत्या क्रमांका पर्यंत आहे ते नमूद करावे.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ५ मध्ये तालुका कार्यालयातील अभिलेख कक्षात, संपलेली पावती पुस्तके कोणत्या दिनांकास जमा केली तो दिनांक लिहावा.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ६ मध्ये तालुका कार्यालयातील अभिलेख कक्षात, जमा केलेले प्रत्येक पावती पुस्तके कोणत्या दिनांकास सुरु झाले होते तो दिनांक लिहावा.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ७ मध्ये तालुका कार्यालयातील अभिलेख कक्षात, जमा केलेले प्रत्येक पावती पुस्तके कोणत्या दिनांकास संपले तो दिनांक लिहावा.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ८ मध्ये तालुका कार्यालयातील अभिलेख कक्षात, जमा केलेल्या एखाद्या पावती पुस्तकातील एखादी पावती वापरण्यात आली नसेल तर त्या न वापरलेल्या पावतीचा अनुक्रमांक व ती पावती वापरण्यात का आली नाही ते कारण नमूद करावे.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ ९ मध्ये संपलेली पावती पुस्तके तहसिल कार्यालयाच्या अभिलेख कक्षात जमा केल्यावर अभिलेखापालाची सही न चुकता घ्यावी.

गाव नमुना नऊ-ब च्या तालुक्याला परत पाठवलेली पावती पुस्तके या भागाखालील स्तंभ १० मध्ये या गाव नमुन्याचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याची दिनांकीत अद्याक्षरी घ्यावी.

 गाव नमुना ९-ब
गाव नमुना ९-ब

हेही वाचा – तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.