आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

ई-पीक पाहणी ॲपद्वारे थेट सातबारावर (7/12) बोअरवेल कशी नोंदवावी? जाणून घ्या सविस्तर !

महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपली (EPeek Pahani Borewell Nond) बोअरवेल स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी (Pikanchi Nond), बोअरवेल (EPeek Pahani Borewell Nond), बांधावरच्या झाडांच्या नोंदी, चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपमध्ये थेट सातबारावर (7/12) बोअरवेल (EPeek Pahani Borewell Nond) कशी नोंदवावी ? या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.

ई-पीक पाहणी ॲपद्वारे थेट सातबारा वर (7/12) बोअरवेल नोंदविण्याची प्रोसेस – EPeek Pahani Borewell Nond:

शेतकरी बंधुनो हे लक्षात ठेवा कि ई – पीक पाहणी ॲपद्वारे बोअरवेल (EPeek Pahani Borewell Nond) नोंदविण्यापूर्वी कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती नोंदविणे आवश्यक आहे.  ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App

शेतकरी खातेदार यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून खालील स्टेप्स नुसार ई-पीक पाहणी ॲप मध्ये (EPeek Pahani Borewell Nond) बोअरवेल नोंदणी करावी.

नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी करून खातेदाराचे नाव निवडा.

ई – पीक पाहणी ॲपच्या होम पेजवर असलेल्या कायम पड/चालू पड नोंदवा या टॅबवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या समोर कायम पड/चालू पड जमीन हि स्क्रीन दिसेल. आपण कायम पड/चालू पड नोंदणीसाठीच्या पानावर प्रविष्ठ व्हाल. सुरुवातीला तारीख हा पर्याय आपोआप दिसेल, जो कि कायम पड/चालू पड नोंदविण्याचा दिनांक असेल. त्यानंतर खाते क्रमांक निवडा यावर क्लिक करून हवा असलेला खाते क्रमांक निवडा. त्यानंतर शेताचा गट क्रमांक यावर क्लिक करून हवा असलेला गट क्रमांक निवडा.

त्यांनतर कायम पड/चालू पड प्रकार या पर्यायावर क्लिक करुन कायम पड/चालू पड या दोन पर्यायांपैकी हवा असलेला पड चा योग्य प्रकार निवडा.

कूपनलिका पड नोंदविण्याची प्रक्रिया:

पड चे वेगवेगळे पर्याय दिसतील उदा. चराई पड, गवत पड, झाडी पड, बगीचा पड़ इत्यादी त्यापैकी यादी स्क्रोल करून आपणास हवा असलेला प्रकार निवडा.

आता आपण पड नोंदविण्याची प्रक्रिया जाणून घेऊ. त्यासाठी तुम्ही पड मध्ये कूपनलिका पड हा पर्याय निवडा.

कूपनलिका पड (EPeek Pahani Borewell Nond)
कूपनलिका पड – (EPeek Pahani Borewell Nond)

त्यानंतर कायम पड/चालू पड जमीन क्षेत्र भरण्यासाठी दिलेल्या टॅब मध्ये चालू पडचे क्षेत्र भरावे.

त्यानंतर बरोबर या चिन्हावर क्लिक केल्यावर माहितीची पुष्ठी करा हि स्क्रीन उघडेल. या स्क्रीन वरील माहिती अचूक असल्याची खात्री करून वरील प्रमाणे माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे, या घोषणा पत्रावर क्लिक करून स्वयंघोषणा पत्र करा व पुढे या बटनवर क्लिक करा.

पड छायाचित्र मध्ये दोन फोटो घेऊन अपलोड करावे. आपण नेटवर्क मध्ये असल्यास आपण नोंदविलेली माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश दाखविला जाईल. जर आपण नेटवर्क मध्ये नसाल तर आपणास आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही, आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होम पेज वरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी.

पड छायाचित्र
पड छायाचित्र

माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास डाव्या कोपऱ्यातील रद्द या बटनवर क्लिक करावे, आपणास परत मागील पानावर नेले जाईल. आवश्यक ते दुरुस्ती करून वर सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकरी बंधुनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा कि या नोंदणीसाठी मोबाईल नेटवर्क ची आवश्यकता नाही, आपण नोंदविलेली माहिती सबमिट बटन वर क्लिक करून साठविली जाईल व मोबाईल नेटवर्कमध्ये आल्यावर ती तुम्ही डॅशबोर्डवर असलेल्या अपलोड टॅबवर क्लिक करून अपलोड करू शकता.

अश्या प्रकारे आपण आपल्या बोअरवेल (EPeek Pahani Borewell Nond) नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे सहजरित्या करू शकता. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ॲपमधील मदत या बटनवर क्लिक करून तिथे दिलेल्या प्रश्न उत्तरमधून आपल्या प्रश्नांचे निराकरण करू शकता. तसेच ई-पीक पाहणी ॲपमधील अभिप्राय नोंदवा या टॅबवर क्लिक करून आपला अभिप्राय नोंदवू शकता.

खालील लेख देखील वाचा !

  1. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी?
  2. ई-पीक पाहणी ॲपद्वारे कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी?
  3. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !
  4. ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची?
  5. ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी?
  6. E-Peek Pahani FAQ : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे !
  7. फळबाग पिकांची नोंद सातबारा वर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे कशी नोंदवावी !
  8. गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
  9. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  10. पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.