फळबाग पिकांची नोंद सातबारा वर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे कशी नोंदवावी !
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल अॅप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.
फळबाग पिकांची नोंद सातबारा वर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे कशी नोंदवावी !
गुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करा. आपला विभाग निवडा, आपण नोंदणी करत असलेल्या मोबाईल नंबर वर ४ अंकी सांकेताक (ओ.टी.पी.) पाठविण्यात येईल. त्या ओ.टी.पी. च्या आधारे ॲपमध्ये आपली नोंदणी करा. त्यामध्ये खालील गोष्टींची पूर्तता करा.
खाते क्रमांक निवडा.
• भुमापन / गट क्रमांक निवडा.
• जमीनीचे एकूण क्षेत्र (हे. आर) मध्ये दर्शविली जाईल.
• पोट खराब असल्यास आपल्याला ते आपोआप दर्शविली जाईल.
हंगाम निवडा
1) रब्बी
2) संपूर्ण वर्ष
या दोन पैकी संपूर्ण वर्ष हंगाम निवडा.
पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपोआप दर्शविले जाईल.
पिकांचा वर्ग निवडा.
1) निर्भेळ पिक
2) मिश्र पिक
3) पॉलीहाउस पिक
4) शेडनेटहाउस पिक
या पैकी निर्भेळ पीक निवडल्यास निर्भेळ पिकांचा प्रकार निवडा
1) पीक
2) फळबाग
या दोन पैकी फळबाग प्रकार निवडा
पिकांची / झाडांची नावे खाली दिलेल्या यादीतून निवडा.
• क्षेत्र भरा. (हे. आर)
• झाडांची सख्या भरा.
जल सिंचनाचे साधने निवडा.
• सिंचन पद्धती निवडा.
1) ठिबक सिंचन
2) तुषार सिंचन
3) प्रवाही सिंचन
4) अन्य प्रकारे सिंचन
• लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करा.
• त्यानंतर अक्षांस व रेखांस मिळवा असा पर्याय उपलब्ध होईल यावर क्लिक करा, क्लिक केल्यावर अक्षांस, रेखांस व अचूकता प्राप्त होईल.
• मुख्य पिकाचे छायाचित्र काढा असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून पिकाचा फोटो काढा.
• हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा.
• माहितीची पुष्टी करा या पेज वर खाली स्वयं घोषणा पत्रावर क्लिक करून पुढे यावर क्लिक करा.
• आपली माहिती साठवली व अपलोड झालेली आहे असा संदेश आपल्याला दिसेल.
अश्याप्रकारे तुम्ही फळबाग पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲप च्या साहाय्याने सातबारा वर करू शकता.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!