फळबाग पिकांची नोंद सातबारा वर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे कशी नोंदवावी? जाणून घ्या सविस्तर !
ई-पीक पाहणी ॲपद्वारे फळबाग पिकांची माहिती नोंदविण्याची प्रोसेस – EPeek Pahani Falbag Nond:
शेतकरी बंधुनो हे लक्षात ठेवा कि ई – पीक पाहणी ॲपद्वारे फळबाग पिकांची (EPeek Pahani Falbag Nond) माहिती नोंदविण्यापूर्वी कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती नोंदविणे आवश्यक आहे.
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपला विभाग निवडा, आपण नोंदणी करत असलेल्या मोबाईल नंबर वर ४ अंकी सांकेताक (ओ.टी.पी.) पाठविण्यात येईल. त्या ओ.टी.पी. च्या आधारे ॲपमध्ये आपली नोंदणी करा. त्यामध्ये खालील गोष्टींची पूर्तता करा.
त्यानंतर जमिनीचा खाते क्रमांक भुमापन/गट क्रमांक निवडावा. तुमच्या सदर गटाचे एकूण क्षेत्र ( हे.आर ) व पोट खराब या ठिकाणी आपोआप दर्शविल्या जाईल.
हंगाम निवडा या बटनवर क्लिक केल्यावर सध्या चालू असलेला हंगाम व संपूर्ण वर्ष हे हंगाम दिसतील आपण लागवड केल्याप्रमाणे वरील पैकी हंगाम निवडावा. फळबाग (Falbag Nond) पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपोआप दर्शविले जाईल.
त्यानंतर पिकांचा वर्ग निवडा या ठिकाणी तुम्हाला निर्भेळ पिक, मिश्र पिक, पॉलीहाऊस पिक, व शेडनेटहाऊस पिक, असे चार पर्याय दिसतील यापैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडावा.
आपण निर्भेळ पीक निवडल्यास निर्भेळ पिकाचा वर्ग निवडा मधून पीक किंवा फळबाग (EPeek Pahani Falbag Nond) या पैकी एक वर्ग निवडावा. त्यानंतर क्षेत्र भरा हा पर्याय दिसेल तेथे आपण निवडलेल्या फळबाग (Falbag Nond) पिकाखालील क्षेत्र हे. आर मध्ये भरा.
त्यानंतर जल सिंचनाचे साधने या पर्यायावर क्लिक करून दिलेल्या यादीतून योग्य तो जल सिंचनाचे साधन निवडा. ) त्यानंतर जल सिंचन पद्धती हा पर्याय दिसेल त्यामधून आपणास हवा असेलेला पर्याय निवडावा.
त्यानंतर फळबाग (Falbag Nond) लागवडीचा दिनांक हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर कॅलेंडर ओपन होईल त्यामधून फळबाग (Falbag Nond) पिकाच्या पेरणीचा/ लागवडीचा दिनांक नमूद करावा.
त्यानंतर अक्षांस व रेखांस मिळवा असा पर्याय उपलब्ध होईल यावर क्लिक करा, क्लिक केल्यावर अक्षांस, रेखांस व अचूकता प्राप्त होईल.
मुख्य फळबाग (Falbag Nond) पिकाचे छायाचित्र काढा असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून पिकाचा फोटो काढा आणि हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा. माहितीची पुष्टी करा या पेज वर खाली स्वयं घोषणा पत्रावर क्लिक करून पुढे यावर क्लिक करा. आपली माहिती साठवली व अपलोड झालेली आहे असा संदेश आपल्याला दिसेल. अश्याप्रकारे तुम्ही फळबाग पिकांची (EPeek Pahani Falbag Nond) नोंद ई-पीक पाहणी ॲप च्या साहाय्याने सातबारा वर करू शकता.
या लेखात, आम्ही फळबाग पिकांची (EPeek Pahani Falbag Nond) नोंद सातबारा वर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे कशी नोंदवावी? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
ई-पीक पाहणी संबंधीत खालील महत्वपूर्ण लेख वाचा !
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन कसा पाहायचा? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !
- E-Peek Pahani FAQ : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे !
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!