मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने‘ची घोषणा केली असून या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक (Ladki Bahin Yojana Apply Online) मदत मिळणार आहे. योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील महिलांनी प्रतिसाद दिला आहे. पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कीही ठिकाणी सर्व्हर जाम, पोर्टल, नारीशक्ती दूत ॲप बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक नवीन वेबपोर्टल (Ladki Bahin Yojana Web Portal) सुरू केले आहे
माझी लाडकी बहीण योजना वेबपोर्टल ! Ladki Bahin Yojana Web Portal:
सरकारने योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करता येत होता. मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन, लोड आल्याने नारीशक्ती दूत ॲप बंद या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे सरकारने नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. महिलांना आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन (Ladki Bahin Yojana Apply Online) पद्धतीनेही पटापट भरता येणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता वेबपोर्टल (Ladki Bahin Yojana Web Portal) सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन वेबपोर्टल वरून अर्ज करण्याची प्रोसेस – Ladki Bahin Yojana Apply Online:
सर्वप्रथम खालील मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत (Ladki Bahin Yojana Web Portal) वेबपोर्टल लिंक वर क्लिक करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
पोर्टल ओपन झाल्यावर वरती मुख्य मेनू मध्ये अर्जदार लॉगिन मेनू वर क्लिक करा.
अर्जदार लॉगिन मेनू वर क्लिक केल्यानंतर प्रथम Create Account वर क्लिक करून ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा आवश्यक तपशील व कॅप्चा कोड टाकून Signup क्लिक करा.
Signup क्लिक केल्या नंतर मोबाईलवर OTP येईल तो OTP टाकून पुन्हा कॅप्चा कोड टाकून verify otp वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे खाते तयार करा. खाते तयार झाल्या नंतर मोबाईल क्रमांक, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉगीन करा.
लॉगिन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज’ या मुख्य मेनू पर्यायावर क्लिक करा.
पुढे आपला आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाकून Validate Aadhar वर क्लिक करा.
पुढे नोंदणी अर्जामध्ये महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पिनकोड, वैवाहिक स्थिती, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? इ. तपशील भरा.
पुढे आधार कार्डानुसार अर्जदाराचा पत्ता / महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती भरा आणि अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील भरा.
आवश्यक सर्व माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (हमीपत्र डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
पुढे हमीपत्राचा अस्वीकारण स्वीकारा वर क्लिक करा व Submit या पर्यायावर क्लिक करा.
तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि कॅप्चा कोड टाकून ‘Submit’, या पर्यायावर क्लिक करा.
अर्ज संपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) जाणून घेऊ शकता.
हमीपत्र PDF फाईल : हमीपत्र येथे क्लिक करून डाउनलोड करा आणि आवश्यक तपशील भरून ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड करा.
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढ.
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
- लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय :
- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये लाभासाठी नारीशक्ती दूत ॲपवरून (Ladki Bahin Yojana Apply Online) ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!