आपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेकजणांचेअर्ज (Ladki Bahin Yojana Disapproved Form) म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करुन (Ladki Bahin Yojana Form Resubmit Online)  करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी  तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज (Ladki Bahin Yojana Form Resubmit Online) पुन्हा सबमिट करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल. कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन सर्व संबंधितांना प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय, पण पैसे आले नाही; मग असे करा !

अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु अजूनही ही प्रक्रिया सुरु आहे. काही महिलांच्या खात्यांत येत्या काही दिवसांत पैसे जमा होणार आहे. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. त्यांनी नेमके काय करावे, यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.

  1. तुम्ही लाडकी बहीण पोर्टल किंवा नारीशक्ती अ‍ॅपवरुन अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही. तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा.
  2. बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.
  3. तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा.
  4. आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे.
  5. बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेते ५०० किंवा हजार रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते.
  6. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोस्टात झिरो बॅलन्स मध्ये खाते उघडण्याचे आवाहन !

लाडकी बहीण योजनेचा नामंजूर अर्ज ऑनलाइन पुन्हा सबमिट करा ! Ladki Bahin Yojana Form Resubmit Online:

नारीशक्ती दूत अ‍ॅप:

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समूह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहिणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतू १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Aprroved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील.

अर्ज पुन्हा सबमिट करण्याची प्रक्रिया – Ladki Bahin Yojana Form Resubmit Online Process:

सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल.

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)

खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधितमहत्वपूर्ण लेख वाचा !

  1. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
  2. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
  4. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.