वृत्त विशेष

स्त्रियांच्या मिळकतीचे वारस कोण ?

एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्युपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन) तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र यायोगे मिळालेली मिळकत ही त्या व्यक्तीची स्वष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते आणि त्या व्यक्तीच्या हयातीमध्ये त्या व्यक्तीच्या जोडीदाराला किंवा मुलाबाळांना अशा मिळकतींमध्ये कोणताही मालकी हक्क नसतो.

मिळकतीची संपूर्ण मालकी

हिंदू वारसा कायद्याच्या कलम १४ अन्वये स्त्रियांना एखादी स्थावर किंवा जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखत अशा दस्तांनी, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती स्त्री अशा मिळकतींची संपूर्ण मालक (full owner) होते. ह्याला अपवाद म्हणजे अशा दस्तांनी जर मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क (life interest) दिला असेल तर त्यामध्ये असा मालकी हक्क मिळत नाही.

मिळकतीची विभागणी

हिंदू वारसा कायद्याप्रमाणे पुरुष आणि स्त्री यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीच्या विभागणीमध्ये फरक आहे. जर का एखादी हिंदू स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत कलम १५ (१) प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा- मुलगी, जर मुलगा-मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे आणि ते नसतील तर आई-वडीलांकडे, तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल. तुमच्या केसमध्ये तुमच्या आत्याला मूलबाळ नसल्यामुळे, नवराही मयत असल्यामुळे आणि त्यांनी मृत्यूपत्र केले नसल्याने सदरील मिळकत तिच्या नवऱ्याच्या वारसांकडेच जाईल. अशा वेळी मृत्यूपत्र ‘वेळीच करून ठेवण्याचे’ महत्त्व जास्त जाणवते. कारण ‘Will prevails over Succession & Nomination’.

महत्वाचा अपवाद :

कलम १५(२) च्या अपवादाप्रमाणे जर महिलेला एखादी मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (in absence of any issue) असेल किंवा तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा-मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणीही वारस हयात नसेल तर अशी मिळकत वर कलम १५ (१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे न विभागली जाता केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच जाईल. तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि वरीलप्रमाणेच ती निपुत्रिक असेल, तर अशी मिळकत ही त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल. ‘स्त्रीच्या मृत्यूनंतर अशी मिळकत ही मिळकतीच्या उगमाकडेच जाईल’ हा कलम १५ (२) मधील वरील अपवाद पुरुषांबाबत मात्र दिसून येत नाही! वारसा कायद्याने पुरुषांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे विभाजन कसे होते हा एक स्वतंत्र विषय आहे.

हेही वाचा – पतीऐवजी अपत्येही निवृत्तीवेतन वारसदार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.