वृत्त विशेषमहसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा

राज्याच्या किनारपट्टी आणि सागरी भागात कांदळवन आणि तेथील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पर्यावरणीय व बहुविद्याशाखीय संशोधनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यातील गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे” योजना राज्यात लागू करण्यास मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक ३/०५/२०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार शासन निर्णय दिनांक २४ मे, २०२३ नुसार सदर योजनेची रुपरेषा तसेच अंमलबजावणी बाबत सूचना पारित करण्यात आल्या आहेत.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता सदर शिष्यवृत्ती योजनेबाबत प्रचार आणि प्रसिध्दी करण्याकरीता कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान (कांदळवन प्रतिष्ठान) यांच्याव्दारे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्दी, महाडीबीटी आणि कांदळवन कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी तसेच सदर उपक्रमावर कांदळवन प्रतिष्ठानाच्या युट्यूब व इंस्टाग्राम या सोशल मिडिया साईटस वर Short film प्रदर्शित करण्यात येऊन योजनेची प्रसिध्दी करण्यात आली.

त्याचप्रमाणे योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दोन वेळा वाढ करण्यात आली. तथापि, योजनेच्या निकषांनुसार सर्वच अर्जदार अटींची/निकषांची पूर्तता करत नसल्याचे आढळून आले. यास्तव सन २०२३-२४ मध्ये लाभार्थी मिळून आले नाहीत. हे विचारात घेता, प्रस्तूत योजनेच्या निकषांमध्ये तसेच अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा शासन निर्णय:

>

महाराष्ट्र राज्यातील जे गुणवंत विद्यार्थी कांदळवन व सागरी जैवविविधता या तनुषंगीक विषयात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी, असा शासनाने निर्णय घेतला आहे. सदर योजनेच्या सद्यस्थितीतील शिष्यवृत्तीची अर्हता / निकष यामध्ये तसेच अभ्यासक्रमामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

प्रस्तूत योजनेकरीता शिष्यवृत्तीची सुधारीत अर्हता / निकष खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत:

महाराष्ट्र राज्यातील जे गुणवंत विद्यार्थी कांदळवन व सागरी जैवविविधता या तनुषंगीक विषयात (Earth and Marine Science) पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, व पीएचडी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) Ranking ३०० च्या आतील / किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतील, अशा एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

प्रस्तूत योजनेचा लाभ प्रदान करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्यात येत असून अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. खालील अभ्यासक्रम / शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.

Marine Science, Marine Environmental Science, Marine Policy Marine Ecology, Mangrove Ecology, Oceanography, Marine Biology, Marine Fisheries, Marine Bio- Technology, Marine Microbiology, Marine Biodiversity, Climate Change and Mangrove Biodiversity/Marine Biology, Carbon Sequestration in Mangroves/Marine Ecosystem, Sea level rise in mangroves, Marine/Coastal Management etc.

सदर योजनेच्या अंमलबजावणी करिता शासन निर्णय दिनांक २४ मे २०२३ मधील अन्य अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून सदर योजनेकरीता त्या लागू राहतील.

महसूल व वन विभाग शासन निर्णय : गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे योजनेचे निकष व अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – विदेशामध्ये जॉबसाठी महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या सोशल मिडिया चॅनलमध्ये सहभागी व्हा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.