वैयक्तिक लाभाची योजना : 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन योजनेसाठी अर्ज सुरु !

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागा मार्फत ग्रामीण महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गंत 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन पुरवण्यात येतील.

इच्छूक लाभार्थ्यांनी त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 मार्च 2023 पर्यंत तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी वेळेत सादर करावेत.

वैयक्तिक लाभाची योजना : 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन:

विहित मुदतीनंतर सादर केलेले अथवा अपूर्ण असलेले प्रस्ताव मंजूर करण्यांत येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे.

 योजनेच्या अटी व शर्ती:

१) विहित नमुन्यातील अर्ज (लाभार्थी फोटोसह),

२) रहिवाशी प्रमाणपत्र(ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र),

३) मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.

४) सदर महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील किंवा त्यांचे सन 2021- 22 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांच्या आत असावे,

५) यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे,

६) लाभ धारकांकडे शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे,

७) शिलाई मशिन विक्री / हस्तांतर न करण्याचे हमीपत्र असावे,

८) लाभधारकांस 90 टक्के अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल (पाच हजार रुपयांच्या मर्यादेत),

आधार कार्ड सत्यप्रत, बँक पासबुकाची ठळक छायांकित प्रत, वस्तू खरेदीची जीएसटीसह पावती, शिलाई मशीन सह लाभार्थींचा पोस्टकार्ड रंगीत साईज फोटो, लाभार्थी निवडीबाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत, प्राप्त सर्व प्रस्ताव सन 2022- 23 या आर्थिक वर्षापूरतेच तसेच उपलब्ध निधीच्या मर्यादेत राहतील, लाभार्थी निवड करण्याचा अधिकार कार्यालयाने राखून ठेवला आहे असे महिला बाल विकास विभागाच्या वतीने कळविले आहे.

हेही वाचा – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

2 thoughts on “वैयक्तिक लाभाची योजना : 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन योजनेसाठी अर्ज सुरु !

 • February 20, 2023 at 8:04 am
  Permalink

  Arj chi pdf pn attach Kara sir

  Reply
  • February 20, 2023 at 8:51 pm
   Permalink

   अर्ज संबंधित कार्यालयात भेटेल.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.