गृहनिर्माण संस्था कायदावृत्त विशेष

तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान : सोसायट्यांमधील भांडणं पोलिसांशिवाय मिटणार !

तंटामुक्त गाव अभियानप्रमाणेच आता राज्य शासनाने तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांमधील पाणी कचऱ्यासह इतर भांडणे मिटण्यास मदत होणार आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास पोलिस ठाण्यापर्यंत जाणारी भांडणेही कमी होणार आहेत.

तंटामुक्त गृहनिर्माण संस्था : सोसायट्यांमधील भांडणं पोलिसांशिवाय मिटणार !

सहकार विभागातर्फे याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, पुणे, मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर आणि जिल्ह्यातील इतर शहरात गृहनिर्माण संस्था कमी असल्याने याची अंमलबजावणी करण्यावर मर्यादा येत असल्याचे सहकार विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

काय आहे अभियान ?

खेड्यात आपसांतील वाद सामोपचाराने मिटविण्यास मदत करण्यासाठी राज्य सरकारने २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु केले. याच धर्तीवर राज्य सरकारने आता शहरी भागासाठी ‘तंटामुक्त गृहनिर्माण संस्था’ अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

भांडण कसे मिटविणार? 

अभियानांतर्गत गृहनिर्माण संस्था, तालुका आणि जिल्हास्तरावर सल्लागार समित्या नेमण्यात येणार आहे. सल्लागार समितीने दिलेला निर्णय तक्रारदारास मान्य नसल्यास तक्रारीच्या स्वरूपानुसार निबंधक, सहकारी न्यायालय, दिवाणी न्यायालय, स्थानिक प्राधिकरण, महापालिका, पोलिस किंवा गृहनिर्माण फेडरेशनकडे अर्ज करता येईल. तंटामुक्त अभियानात सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामकाज करणाच्या गृहनिर्माण संस्थांना सन्मानित करणार आहे.

शहरात गृहनिर्माण संस्था

शहरातही गृहनिर्माण संस्था आहेत. यामधील रहिवाशांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद, भांडणे होतात. ती मिटवण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे.

तक्रार कोठे करणार?

  • तक्रारदारास लेखी अर्ज व्यवस्थापन समितीकडे सादर करावा लागणार आहे. समितीच्या बैठकीत तक्रार अर्जावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
  • व्यवस्थापन सभेचा निर्णय १५ दिवसांत कळवण्यात येणार आहे. निर्णयावर समाधान न झाल्यास समितीकडे तक्रार करता येईल.

पोलिसांशिवाय तंटे मिटणार

अभियानातून वाद, भांडणे पोलिसांशिवाय मिटणार आहेत. यामुळे पोलिसांवरील अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.

हेही वाचा – गृहनिर्माण संस्थेच्या समितीचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.