कृषी योजनाकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपुरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये या विविध पुरस्कार, त्यांचे निकष, स्वरुप, पुरस्कारांची रक्कम, निवड समिती व कार्यपद्धतीस मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पुरस्कारांच्या रकमेमध्ये तसेच पुरस्कार्थीच्या दैनिक व प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ शासन निर्णयः-

कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या खालील विविध पुरस्कारांची संख्या व रकमांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे :-

विविध कृषि पुरस्कारांची संख्या व पुरस्काराच्या सुधारित रकमा:-

अ.क्र.पुरस्काराचे नावपुरस्कारांची संख्यासद्याची पुरस्काराची रक्कमपुरस्काराची सुधारित रक्कम
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काररु.७५,०००/-३,००,०००/-
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काररु. ५०,०००/-२,००,०००/-
जिजामाता कृषिभूषण पुरस्काररु. ५०,०००/-२,००,०००/-
कृषिभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्काररु. ५०,०००/-२,००,०००/-
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काररु.३०,०००/-१,२०,०००/-
युवा शेतकरी पुरस्काररु.३०,०००/-१,२०,०००/-
उद्यानपंडीत पुरस्काररु. ५०,०००/-२,००,०००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- सर्वसाधारण गट३४रु.११,०००/-४४,०००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- आदिवासी गटरु.११,०००/-४४,०००/-
१०पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार१०
११उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार

पुरस्कार्थीना पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता द्यावयाच्या दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात येत असून, दैनिक व प्रवास भत्त्याची रक्कम प्रति पुरस्कार्थी रु. १५,०००/- इतकी अनुज्ञेय राहिल. सदर दैनिक व प्रवास भत्ते विहित कार्यपद्धतीनुसार देण्यात येतील.

सदर शासन निर्णयानुसार पुरस्काराच्या रकमांमध्ये तसेच दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत होणारी वाढ सन २०२० पासूनच्या विविध कृषि पुरस्कारार्थीच्या निवडीसाठी लागू राहील.

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.सं. क्र. ३६१/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून तसेच मा. उपमुख्यमंत्री (वित्त), उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय : कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबधित कार्याकरीता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची संख्या, पुरस्कारांच्या रकमेमध्ये तसेच पुरस्कार्थींच्या दैनिक व प्रवास भत्त्या मध्ये वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आता ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.