आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया!
आजच्या डिजिटल युगात आधार मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. बँकिंग, शासकीय योजना, PAN-Aadhaar लिंकिंग, मोबाइल सिम व्हेरिफिकेशन, पेंशन, ई-KYC, UPI, DigiLocker अशा जवळजवळ सर्व सेवांसाठी आधार OTP आवश्यक असतो. त्यामुळे तुमच्या आधारमध्ये तुमचा योग्य आणि चालू मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे.
UIDAI ने अलीकडेच Aadhaar ॲपमध्ये नवीन अपडेट आणले असून आता तुम्ही मोबाईल नंबर घरबसल्या ऑनलाइन अपडेट करू शकता. या लेखात आपण आधार मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत.
⭐ आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक करणे का आवश्यक आहे?
मोबाईल नंबर आधारला लिंक (Aadhaar Mobile Number Link) केलेला असल्यास तुम्हाला खालील सुविधा सहज व सुरक्षितरीत्या मिळतात:
Aadhaar OTP आधारित सेवा
बँक KYC व e-KYC
UPI / Payments apps वापरणे
PAN–Aadhaar लिंक
सरकारी योजना, सबसिडी, Scholarship
DigiLocker, mAadhaar लॉगिन
Passport व Police Verification
इतर अनेक Aadhaar correction services
म्हणून आधार मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) ठेवणे आजच्या काळात अनिवार्य बनले आहे.
⭐ आधार मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आवश्यक गोष्टी
Aadhaar ॲप (Play Store / App Store वर उपलब्ध)
Aadhaar नंबर
चालू मोबाईल सिम (SMS पाठवण्यासाठी)
फेस ऑथेंटिकेशन
75 रुपये फी (ऑनलाइन पेमेंट)
नवीन मोबाईल नंबर
📲 आधार मोबाईल नंबर लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया – Aadhaar Mobile Number Link:
आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) करण्यासाठी UIDAI च्या अद्ययावत सूचनांनुसार, खालील प्रक्रिया फॉलो करा:
मोबाईलमध्ये Aadhaar ॲप इन्स्टॉल करा:
Play Store / iOS वर जाऊन “Aadhaar App (UIDAI)” डाउनलोड करा आणि त्यानंतर हे अँप ओपन केल्यावर Skip Introduction And Register हा पर्यायावर क्लिक करा, तसेच I‘m ready with my Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
पुढे ज्या व्यक्तीचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) करायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे व Continue या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर अटी व शर्ती मान्य करून Proceed या पर्यायावर क्लिक करा आणि i am under 18 and my aadhaar is linked to my parent/guardian (HOF) for face authentication यावर क्लिक करून Are you sure तिथे Yes करून आपले Sim सिलेक्ट करा व Send SMS वर क्लिक करा, पुढे Continue To Face Authentication या पर्यायावर क्लिक करा.
चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication):
चष्मा घातला असेल तर काढा.
चेहरा गोल फ्रेममध्ये ठेवा.
डोळे उघडणे/मिचकावणे यासारखे सूचनांचे पालन करा.
यानंतर ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्याचा फेस इथे घ्यायचा आहे त्यासाठी Initiate Face Authentication या पर्यायावर क्लिक करून आपले Face Authentication करायचे आहे आणि नंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा.
6-अंकी PIN सेट करा:
ॲप लॉगिनसाठी एक सुरक्षित सहा अंकी PIN सेट करा व Confirm करा. यानंतर वरती Skip Guide हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
आधार मोबाईल नंबर अपडेट (Aadhaar Mobile Number Update):
यानंतर त्याखाली Services मध्ये My Aadhaar Update हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून Mobile Number Update या पर्यायावर क्लिक करा, तसेच खाली Continue या पर्यायावर क्लिक करा.
आधी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल:
आता जो अगोदर लिंक केलेला नंबर आहे त्यावरती OTP पाठवला जाईल तो OTP टाकून Submit करायचं आहे. पुढे तुमचा जुना मोबाईल नंबर दाखवला जाईल व त्याखाली नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे व Send OTP या पर्यायावर करून सहा अंकी OTP टाकून Verify या पर्यायावर क्लिक करा.
(ज्यांचा पूर्वी कोणताही मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) नाही, त्यांच्यासाठी लवकरच सेवा उपलब्ध होणार आहे.)
पुन्हा Face Authentication करा:
UIDAI सिक्युरिटीप्रमाणे पुन्हा एकदा फेस ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. पुन्हा चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) करण्यासाठी Face Authenticate या पर्यायावर क्लिक करून अगोदर जसे केलं त्याचप्रमाणे करायचं आहे
Payment करा:
UIDAI ने निश्चित केलेली मोबाईल नंबर अपडेट फी ₹75 आहे, “Confirm & Pay” क्लिक करा आणि ₹75 (UPI/GPay/PhonePe) भरून प्रक्रिया पूर्ण करा.
Acknowledgement PDF डाउनलोड करा:
शेवटी “Download Acknowledgement” करा. ७–१० दिवसांत तुमचा नवीन मोबाईल नंबर आधारला लिंक (Aadhaar Mobile Number Link) होतो.
या लेखात, आम्ही आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक (Aadhaar Mobile Number Link) करण्याची ऑनलाइन प्रक्रिया! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
- आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)
- आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
- आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
- तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
- तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
- घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

