महसूल विभागाच्या ePropertycard अॅपवर अशी पहा तुमच्या जमिनीची मिळकत पत्रिका
मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले आहे.
या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्मित केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी यावेळी केले आहे.
“e-PropertyCard” अॅपवर जमिनीची मिळकत पत्रिका पहा:
मोबाइल मध्ये e-PropertyCard ईप्रॉपर्टीकार्ड अॅप इन्स्टॉल करा.
ईप्रॉपर्टीकार्ड अॅप इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा, त्यानंतर नागरिकांना विभाग (Division) निवडून सीएस क्रमांक (CS Number) म्हणून ओळखल्या जाणार्या कॅडस्ट्रल सर्व्हे नंबर टाकून जमीन धारण तपशील पाहण्यासाठी “Search” वर क्लिक करा.
“Search” वर क्लिक केल्यानंतर जमीन धारण तपशील आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये प्रभाग नाव, सीएस (कॅडस्ट्रल सर्व्हे) क्रमांक, नोंदणी क्रमांक, पृष्ठ क्रमांक, पत्रक क्रमांक (नकाशा), जागेचे स्थान, कार्यकाळ म्हणजे जमिनीचे क्षेत्र, सीआरआर (जिल्हाधिकारी भाडे रोल) क्रमांक आणि मालमत्तेचे सर्व धारक.
हेही वाचा – मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!